भाजीविक्रेते आणि पोलीस यंत्रणा वेठीस धरत मनमानी युवा नेत्याचे एकाच बेकायदेशीर धंद्याविरुद्ध सातत्याने आंदोलन :शहरात ठरला चर्चेचा विषय
कोल्हापूर – शहर आणि परिसरात मायको प्रायमन्स कंपन्यांकडून चाललेली बेकायदा वसुली तसेच विविध ट्रेनिंग कंपन्याकडून होत असलेली फसवणूक असे आर्थिक फसवणुकीचे विविध प्रकार राजरोसपणे होत असताना एका मनमानी स्वयंघोषित युवा नेत्याकडून मात्र शहरातील फक्त मटका याच एका बेकायदेशीर धंद्याविरुद्ध गेले दीड महिन्याहून अधिक काळ सुरु असलेले आंदोलन हा चर्चचा विषय ठरत आहे .त्यांच्या अधिपत्याखाली असलेले किरकोळ भाजी विक्री करणारे नेहमी मोर्चा – निवेदने देणा साठी हक्काने बोलविण्या सह थेट पोलिस यंत्रणेपर्यंत सर्वांनाच वेठीस धरण्याचा हा प्रकार दिसून येत असून याविषयी शहरात उलट सुलट चर्चा आता उघडपणे सुरू झालेली आहे . कोल्हापुरातील पाच बंगला परिसरातील भाजी विक्री त्यांना न्याय देण्यासाठी सातत्याने सदर युवा नेत्यांनी केलेले काम ही त्याची एकमेव जमेची बाजू आहे मात्र त्याचबरोबर या समस्त भाजी विक्रेते ना आपल्या वेगवेगळ्या आंदोलनासाठी हक्काने नेणे आणि त्यामध्ये ही आता गेले दीड महिना अधिक काळ एका विशिष्ट आंदोलनासाठीच – अर्थात मटका विरोधात आंदोलना साठीच त्यां ने वेळोवेळी मोर्चा काढणे आणि या विक्रेत्यांसह पोलीस यंत्रणा ही वेठी स धरण्याचा प्रकार या सदर युवा नेत्याकडून होत आहे त्यामुळे त्याच्या आता या आंदोलनाविषयी संशयास्पद वातावरण सर्वत्र निर्माण झालेली आहे . सदर आंदोलनामध्ये आपल्या पक्षाच्या इतरही पदाधिकाऱ्यांना सहभागी न करून घेता आपणच स्वतंत्रपणे हे आंदोलन सदर नेता करत असल्याने पक्षांतर्गत ही याविषयी नाराजी आणि शंका व्यक्त केल्या जात आहेत . दरम्यान आता महाराष्ट्राचा विकासाचा बहु चर्चित ब्लू प्रिंट मांडणाऱ्या या संघटना या पक्षाच्या संस्थापक नेत्यांनीच यामध्ये लक्ष घालावे . यासाठी कोल्हापूरचे दायित्व असलेल्या यश शिखरावरील वरिष्ठ उपनेत्या ने सुद्धा या संदर्भातील किल्ला दमदारपणे लढवून सदर आंदोलनामागील नेमका हेतू काय याची तटस्थपणे चौकशी करणे आणि या मधील सत्यता उघडकीस आणणे हे आगामी काळात पक्षीय प्रभाव आणि विस्तार यासाठी गरजेचे बनले आहे .
