मराठा सेवा संघ महाअधिवेशनात
‘डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला !’ पुस्तकाचे प्रकाशन
मराठा सेवा संघ, परभणी आयोजित राज्यस्तरीय महाअधिवेशन २०२२ हे राजलक्ष्मी लाॅन्स येथे थ
दि. २३ डिसेंबर ते २५ डिसेंबर या काळात आयोजित केले होते. या राज्यस्तरीय महाअधिवेशाचे उद्घाटन मा. राजेश दादा विटेकर अध्यक्ष जि.प.परभणी यांचे हस्ते शोभायात्रेची सुरुवात करून व ग्रंथदिडी काढून संपन्न झाले होते.
समारोपाच्या दिवशी पहिल्या सत्रात संगीतसूर्य केशवराव भोसले राष्ट्रीय सांस्कृतिक परिषद प्रस्तुत सांस्कृतिक कलारंग २०२२ अंतर्गत पुस्तक प्रकाशन सोहळा व सांस्कृतिक ललित कला केंद्र उद्घाटन झाले या कार्यक्रमाचे संयोजक डाॅ. सतीश पावडे व समन्वयक मा. प्रकाश लेनेकर होते. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात नवनाथ दत्तात्रय रेपे यांनी लिहलेले तिसरे व रुक्माई प्रकाशन बीड यांनी प्रकाशित केलेल्या ‘डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला!’ या दुस-या पुस्तकाचे प्रकाशन महाअधिवेशात मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. पुरूषोत्तम खेडेकर यांचे हस्ते संपन्न झाले.
यावेळी विचार मंचावर माजी आ. रेखाताई खेडेकर, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मा. मनोज आखरे, कामाजी पवार राष्ट्रीय अध्यक्ष म.से.स., मा. मधुकररावजी मेहकरे, मा. अर्जूनरावजी तनपुरे, मा. विशाल इंगोले, राष्ट्रीय समन्वय प्रकाश लेनेकर व प्रदेशाध्यक्ष वर्षाताई धाबे व पुस्तकाचे लेखक नवनाथ रेपे हेही उपस्थित होते.

