
सारथी व महा ज्योती या संशोधन व प्रशिक्षण संस्थाप्रमाणे बार्टी कडील 861 पात्र संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मिळावी या मागणी करता संशोधक विद्यार्थ्यांनी आझाद मैदान मुंबई येथे गेले 44 दिवस आंदोलन करत आहेत याची राज्य सरकारने दखल न घेतल्याच्या निषेधार्थ व अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अनुसूचित जाती विकास योजनांच्या निधीमध्ये मोठी कपात केल्याचा जाहिर निषेधार्थ पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे सोमवार दिनांक 3 एप्रिल 2022 रोजी दुपारी तीन वाजता निदर्शने व धरणे आंदोलन करीत असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत मुळे यांनी एका प्रसिद्धी पत्रक आधारित दिली आहे

कुंणबी – मराठा समाजासाठी असलेली सारथी आणि ओबीसी समाजासाठी असलेली महाज्योती या संशोधन प्रशिक्षण संस्थांनी संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप दिली आहे सारथी ने 856 तर महायुतीने 1226 संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशीप मुक्तहस्ते दिली आहे पण डॉ . बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी ) कडील अनुसूचित जातीच्या 861 संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशीप नाकारली जाते 861 संशोधक विद्यार्थी फेलोशीप मिळावी या मागणी करिता 20 फेब्रुवारी 2023 पासून आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करत आहेत याची राज्य सरकारने दखल न घेतल्याचे निषेर्धात व विद्यमान राज्य शासनाने 08 मार्च 2023 अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अनुसूचित जाती विकास योजनेच्या निधीमध्ये मोठी कपात केली आहे गेल्या वर्षीच्या तात्कालीन सरकारने अनुसूचित जाती वस्त्यांच्या मूलभूत सुविधा करिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेत 1200 कोटी रुपयांची तरतूद केली होती पण या विद्यमान सरकारने यावर्षी 840 कोटी रुपयाची तरतूद करून गेल्या वर्षीच्या तुलनेत 360 कोटी रुपयांची कात्री लावण्यात आली आहे अनुसूचित जातीच्या बेरोजगार उद्योजकांसाठी केंद्र सरकारच्या स्टँड अप इंडिया योजनेत 90 कोटी रुपयांची कपात तर परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे मिळणाऱ्या शिष्यवृत्ती मध्ये 95 कोटी रुपयांची कपात केले आहे तसेच बार्टीच्या निधीमध्ये 30 टक्क्याने कपात केली आहे
मुंबई येथील इंदू मिलच्या जागेवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकासाठीच्या निधीमध्ये 40 कोटी रुपयांची कपात केली आहे
या वेगवान निर्णय घेणाऱ्या मतिमंद सरकारचा जाहीर निषेध करीत आहोत असेही प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे
पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना