सोमवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचा धडक मोर्चा

सोमवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचा धडक मोर्चा

सोमवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचा धडक मोर्चा

 

जयसिंगपूर / प्रतिनिधी
कोथळी-उमळवाड बसस्थानकाच्या जागेवर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभा करण्याचा प्रस्ताव एस. टी.महामंडळाकडे देण्यात आला आहे, तो प्रस्ताव तातडीने मंजूर करून मिळावा आणि १४ एप्रिल रोजी या जागेवर भूमिपूजन व्हावे, या मागणीसाठी तालुक्याचे आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर त्यांच्या कार्यालयावर व जयसिंगपुर नगरपालिकेवर सोमवार दि.3 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता धडक मोर्चाचे नियोजन केले असल्याची माहिती विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीने पत्रकार परिषदेत दिली.
आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिरोळ तालुक्यातील आंबेडकरवादी विचारांच्या नेत्याची व्यापक बैठक घेवून छत्रपती शिवाजी महाराज आणि घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा जयसिंगपूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी बसविण्यात यावा, अशी मागणी केल्यानंतर आमदार यड्रावकर यांनी दोन्ही महामानवांचे पुतळे जयसिंगपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बसविण्यात येतील, असा ठाम विश्वास बैठकीतील मागासवर्गीय नेत्यांना दिला होता. त्यानुसार आमदार यड्रावकर यांच्या विजयानंतर दोन महामानवांचे पुतळे बसविण्याच्या कामाला गती आली. शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्याचे काम सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासाठी जागेची चाचपणी सुरू असताना न्यायालयाच्या इमारतीच्या ठिकाणी पुतळा बसविण्यात यावा, अशी मागणी पुढे आली. मात्र न्यायालयीन इमारतीमध्ये सध्या न्यायालयीन रेकॉर्ड आहे. शिवाय, तो जागा न्यायालयीन कर्मचान्यांच्या निवासासाठी तसेच सहकार न्यायालयासाठी या मागण्या प्रलंबित आहेत. तसेच सांगली-कोल्हापूर हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने महामार्गाच्या कक्षेमध्ये न्यायालयाची इमारत येत असल्याने ती मोठी अडचण असून महाराष्ट्र शासन, मे. उच्च न्यायालय आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या सर्व परवानग्या पुतळा उभारणीसाठी जागा उपलब्ध करून घेणेसाठी आवश्यक असल्याने ही बाब फार कालावधी घेणारी आहे. म्हणून जयसिंगपूर बसस्थानकातील उमळवाड-कोथळी बसस्थानकाच्या जागेवर डॉ. राजेंद्र पाटील-यड्राकवर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती बसविण्यासाठी शासनाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव वरिष्ठांच्याकडे पाठविलेला आहे. या प्रस्तावास लवकरच मंजुरी मिळेल. मात्र १४ एप्रिलला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने या दिवसाला विशेष महत्व आहे. यादिवशी त्या जागेवर ध्वजारोहण करून पुतळा उभारणी करणेकामी भूमिपूजन करण्यात यावे, यासाठी सोमवार दिनांक ३ एप्रिल रोजी मोर्चाचे आयोजन केले आहे. हा मोर्चा कोणाच्याही विरोधात नसून आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सुचविलेल्या जागेवर पाठविलेल्या प्रस्तावास तात्काळ मंजुरी मिळून कामकाजास सुरूवात व्हावी, हाच हेतू या मोर्चा काढण्यामागे आहे. तेव्हा मुख्याधिकारी व आमदार यांनी तात्काळ प्रस्तावास मंजुरी मिळवून द्यावी, अशी आमची मागणी आहे.
पत्रकार परिषदेस जयपाल कांबळे, सुरेश कांबळे,बाळासो कांबळे, डॉ. सुभाष सामंत, बी.आर.कांबळे,अभिजित आलासकर, सुर्यकांत कांबळे, अब्दुल बागवान, धम्मपाल ढाले, अनिल लोंढे यावेळी जयपाल कांबळे, सुरेश कांबळे, , संजय शिंदे,अभिजीत आलासकर, पद्माकर कांबळे,आनंद शिंदे,सुनीता पवार,माधुरी आलासकर,रेश्मा गायकवाड ,सुभाष साठे,संदीप बिरणगे उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *