पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने

पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने

पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने

पूणे : सारथी व महा ज्योती या संशोधन व प्रशिक्षण संस्थाप्रमाणे बार्टी कडील 861 पात्र संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मिळावी या मागणी करता संशोधक विद्यार्थ्यांनी आझाद मैदान मुंबई येथे गेले 44 दिवस आंदोलन करत आहेत याची राज्य सरकारने दखल न घेतल्याच्या निषेधार्थ व अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अनुसूचित जाती विकास योजनांच्या निधीमध्ये मोठी कपात केल्याच्या निषेर्धात सोमवार दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पॅंथर आर्मी स्वराज क्रांती सेना संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज मुल्ला सर व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्राकांत मुळे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने धरणे आंदोलन करण्यात आले
कुंणबी – मराठा समाजासाठी असलेली सारथी आणि ओबीसी समाजासाठी असलेली महाज्योती या संशोधन प्रशिक्षण संस्थांनी संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप दिली आहे सारथी ने 856 तर महायुतीने 1226 संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशीप मुक्तहस्ते दिली आहे पण डॉ . बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी ) कडील अनुसूचित जातीच्या 861 संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशीप नाकारली जाते 861 संशोधक विद्यार्थी फेलोशीप मिळावी या मागणी करिता 20 फेब्रुवारी 2023 पासून आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करत आहेत याची राज्य सरकारने दखल न घेतल्याचे निषेर्धात व विद्यमान राज्य शासनाने 08 मार्च 2023 अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अनुसूचित जाती विकास योजनेच्या निधीमध्ये मोठी कपात केली आहे गेल्या वर्षीच्या तात्कालीन सरकारने अनुसूचित जाती वस्त्यांच्या मूलभूत सुविधा करिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेत 1200 कोटी रुपयांची तरतूद केली होती पण या विद्यमान सरकारने यावर्षी 840 कोटी रुपयाची तरतूद करून गेल्या वर्षीच्या तुलनेत 360 कोटी रुपयांची कात्री लावण्यात आली आहे अनुसूचित जातीच्या बेरोजगार उद्योजकांसाठी केंद्र सरकारच्या स्टँड अप इंडिया योजनेत 90 कोटी रुपयांची कपात तर परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे मिळणाऱ्या शिष्यवृत्ती मध्ये 95 कोटी रुपयांची कपात केले आहे तसेच बार्टीच्या निधीमध्ये 30 टक्क्याने कपात केली आहे
मुंबई येथील इंदू मिलच्या जागेवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकासाठीच्या निधीमध्ये 40 कोटी रुपयांची कपात केली आहे
या वेगवान निर्णय घेणाऱ्या मतिमंद सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष गुरु कट्टी,राष्ट्रीय प्रभारी विकास आप्पा कांबळे, प्रदेश महासचिव डॉ. सतीश नगरकर, महिला प्रदेश कार्यध्यक्षा सौ.सिंधुताई तुळवे,मुंबई प्रदेश महिला संघटक सौ.मिराताई बावस्कर, प्रदेश सचिव अनुष बेनीझर,पुणे जिल्हाध्यक्ष पश्चिम शरनु नाटेकर, पुणे शहरध्यक्ष संतोष लांडगे, पिं.चिं.शहरध्यक्षा सौ.ज्योतीताई झरेकर, पिं.चिं.शहर उपाध्यक्षा सौ.शुभांगी ताई शिंदे, महिला पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सौ.विजयाताई खताळ,पुणे जिल्हा संपर्क प्रमुख संजय मडपे,पुणे शहर कार्यध्यक्ष बाळासाहेब ढावरे,पुणे जिल्हा महिला कलावती नाटेकर,पुणे शहर उपाध्यक्ष हासीमभाई खान,पुणे शहर संपर्क प्रमुख संदिपभाऊ शेंडगे,पिं.चिं.शहर उपाध्यक्ष प्रवीण चव्हाण,पुणे शहर संघटक पँट्रीक फ्रांसिस,छ.शि.म.संघाचे अध्यक्ष राजेश रेड्डी, पुणे कँन्टो.म.संघाचे अध्यक्ष आदिलभाई शेख,पर्वती म.संघाचे अध्यक्ष राजाभास्कर आरनेकर,हाडपसर म.संघाचे अध्यक्ष भोजराज शिंगे, आदी मान्यवर पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते..

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *