जयसिंगपूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बस स्टँड आवारात बसवण्याचा मार्ग मोकळा

जयसिंगपूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बस स्टँड आवारात बसवण्याचा मार्ग मोकळा

क्रांती चौकातील उपोषणाची संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते सांगता

यड्रावकर व उपोषणकर्त्यांंमध्ये सकारात्मक चर्चा

गणपतराव पाटील, तहसिलदार अपर्णा मोरे-धुमाळ, मुख्याधिकारी तैमुर मुलाणी, डॅा. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे उपाध्यक्ष विजय पवार यांची प्रमुख उपस्थिती

जयसिंगपूर – दि.१२
भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा जयसिंगपूर शहराच्या क्रांती चौक परिसरात व्हावा यासाठी रमेश शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मागील 32 दिवसांपासून क्रांती चौकातील राजर्षी शाहू महारांजाच्या पुतळ्यासमोर साखळी उपोषण सुरु केले होते. यावर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे प्रतिनिधी म्हणून जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी उपोषण कर्त्यांशी सकारात्मक चर्चा करतांना सर्वमान्य तोडगा काढत उपोषण कर्त्यांना लिंबूसरबत देऊन साखळी व आमरण उपोषणाची सांगता केली. मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या या वादावर मार्ग काढण्यासाठी जयसिंगपूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रणजीत पाटील यांनी उपोषणकर्ते तसेच आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे प्रतिनिधी म्हणून जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, मुख्याधिकारी जयसिंगपूर यांच्यामध्ये चर्चा घडवून आणली. संजय पाटील यड्रावकर यांनी नवा प्रस्ताव आंदोलकासमोर मांडला. आंदोलकांच्या मागणीप्रमाणे सि.स.नं.1251 या कोर्टाच्या ताब्यात असलेल्या जागेमध्ये डॅा.बाबासाहेब आंबेडकर म्युझीयम व MPSC व UPSC स्पर्धा परीक्षा अभ्यासिका उभारणीसाठी नगरपरिषदेकडून ठराव घेऊन शासनाकडे संर्वाना सोबत घेऊन जागा मागणी करु व त्या जागेवर डॅा. बाबासाहेब आंबेडकर म्युझीयम व अभ्यासिका उभारु सि.स.नं.1251 ची जागा थेट पुतळ्यासाठी मागणी करणे अडचणीचे आहे. त्यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारण्यासाठी जयसिंगपूर नगरपरिषदेने एस.टी. स्टॅन्ड परीसरातील जागेचा ठराव दिल्या प्रमाणे त्या ठिकाणी भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारु अशी भूमिका मांडली. उपोषण कर्त्यांनी ही भूमीका मान्य केली व त्यांनी बुधवारी संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषणाची सांगता केली. तत्पूर्वी संजय पाटील यड्रावकर यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत झालेल्या डॅा. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती मधील प्रतिनिंधीशी चर्चा केली होती. त्यानंतर आंदोलनस्थळी आंदोलकांचे प्रमुख प्रतिनिधी रमेश शिंदे (बापू) व श्रीपती सावंत यांनी केवळ पुतळ्यासाठी कोर्टाची सि..स.न. 1251 ची जागा मागीतल्यास ती मिळणार नाही त्यामध्ये अडचणी येतील हे वास्तव आहे. त्यामुळे सि.स.नं.1251 या जागेच्या ठिकाणी म्युझीयमसाठी जागा मागणी करण्यास आम्ही मान्यता दिली असल्याचे सांगितले व त्यामुळे आम्ही साखळी उपोषण आजपासून स्थगीत करीत असल्याचे घोषित केले.
सि.स.नं.1251 मधील म्युझीयमसाठीच्या नगरपरिषदेच्या ठरावाची प्रत व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे पत्र आंदोलनकर्त्यांना देण्यात आले. प्रारंभी ॲड. संभाजीराजे नाईक यांनी प्रास्ताविक करताना या सर्वमान्य तोडग्याबाबतची माहिती दिली. संजय पाटील यड्रावकर यांनी डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जयसिंगपूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी उभारावा ही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची मुख्य भुमिका होती, आणि ती आजही आहे असे सांगत सर्वांना सोबत घेऊन सि.स.नं.1251 च्या मिळकतीमध्ये भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने भव्य म्युझीयम व अभ्यासिका तसेच एस.टी.स्टॅन्ड परिसरात भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारला जाईल अशी ग्वाही दिली यावेळी आंदेलकांनी फटाके फोडत या निर्णयाचे स्वागत व अभिनंदन केले.मुख्याधिकारी तैमुर मुलाणी यांनी नगरपरिषदेने केलेल्या ठरावाचे वाचन केले तर ॲड. संभाजीराजे नाईक यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या पत्राचे वाचन केले. दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, तहसिलदार अपर्णा मोरे-धुमाळ, माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे, मिलींद शिंदे, माजी नगरसेवक राहूल बंडगर, यांच्यासह आंबेडकरवादी जनता व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *