आधार संस्थेतर्फे पुरस्कारांची घोषणा; आज वितरण
इचलकरंजी ता. 15 एप्रिल – सामाजिक कार्यात अग्रस्थानी असलेल्या येथील आधार बहुउद्देशीय सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा संस्थेच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या मान्यवरांना आधार भूषण, आधार गौरव व आधार विशेष पुरस्काराने सन्मानित केले जाते. यंदाच्या गौरव व विशेष पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून रविवार 16 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता पुरस्कार वितरण सोहळा कृष्णानगर येथील आधार लायब्ररीत संपन्न होत आहे, अशी माहिती आधार संस्थेचे अध्यक्ष तौफिक मुजावर, बैतुलमाल कमिटी अध्यक्ष लतिफ गैबान, आधार लायब्ररीचे अध्यक्ष मेहबूब मुजावर, ईद फेस्टिवलचे उपाध्यक्ष नुरमहंमद बागवान, संस्था उपाध्यक्ष हारुण पानारी यांनी दिली. दरम्यान, रमजान ईद निमित्त आधार बैतुलमाल कमिटीच्यावतीने याचदिवशी (16 एप्रिल) रोजी गरजू लोकांना खीर मसाला साहित्य वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावर्षी संस्थेच्यावतीने अॅड. संजू सिकंदर नदाफ (न्याय), महंमदगौस मक्तुम मुजावर (अभियंता), डॉ. जाफर महंमद मुल्ला (वैद्यकिय), अरुणकुमार अंकुश पिसे (शैक्षणिक), सौ. नजमा अल्लानूर मुल्ला (शैक्षणिक) यांची ‘आधार गौरव’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर पोलिस उपनिरिक्षक करिश्मा बाळासो शेख यांना ‘आधार विशेष’ पुरस्काराने गौरविण्यात येणार असून रसुल गुडूसाब सय्यद यांना ‘उत्कृष्ठ संचालक’ पुरस्कार देण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण व खीर मसाला साहित्य वाटप समारंभ खासदार धैर्यशील माने यांचे हस्ते आणि शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख रविंद्र माने, भाऊसो आवळे, झाकीरहुसेन भालदार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
Posted inकोल्हापूर
आधार संस्थेतर्फे पुरस्कारांची घोषणा; रविवार 16 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता पुरस्कार वितरण सोहळा
