वसई : दिनांक 14/4/2023, पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतिने डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जंयती विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय वसई ईस्ट वीणा डेनेस्टी सर्कल येथे मोठया उत्साहात साजरी करण्यात आली

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या मुंबई प्रदेश संघटक मीरा प्रमोद बावस्कर होत्या. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले , जोशना मंत्री नियोजक राजेश गुप्ता, सहकार्य, अमित माने अंजली माने कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्ता दाऊद सर परेश सुकुर घाटाळ पालघर जिल्हाध्यक्ष, प्रथम विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देऊन तसेच लहान मुलांना बक्षीस वितरण चा सोहळा करून कार्यक्रमाचे सांगता करण्यात आले विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे हे पहिले वर्ष अशा पद्धतीने साजरे करण्यात आले