जयसिंगपूर बस स्थानक आवारातील जागा डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याला दिल्याबद्दल हत्तीवरून मिरवणूक काढून आमदार यड्रावकरांचा सत्कार करणार -सुनील कुरुंदवाडे

जयसिंगपूर बस स्थानक आवारातील जागा डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याला दिल्याबद्दल हत्तीवरून मिरवणूक काढून आमदार यड्रावकरांचा सत्कार करणार -सुनील कुरुंदवाडे

जयसिंगपूर बस स्थानक आवारातील जागा डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याला दिल्याबद्दल
हत्तीवरून मिरवणूक काढून आमदार यड्रावकरांचा सत्कार करणार सुनील कुरुंदवाडे
कुरुंदवाड प्रतिनिधी
बहुजन समाज आणि दलित बांधवांची अस्मिता आणि श्वास असलेले भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती कृती पुतळा जयसिंगपूर शहरात क्रांती चौकामध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये उभा करण्याचे काम हाती घेतल्याबद्दल तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सन्मान हवा या हेतूने कुरुंदवाड शहरातील बौद्ध बांधव यांच्या वतीने आमदार राजेंद्र पाटील यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात येऊन भव्य नागरी सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती लोकशक्ती पार्टी जिल्हाध्यक्ष सुनील कुरुंदवाडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली
शिरोळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजेंद्र पाटील यड्राव कर यांनी शिरोळ तालुक्यात सर्वांगीण विकासासाठी सुमारे पंधराशे कोटी रुपयांची विकास निधी आणून शिरोळ तालुक्याचा चेहरा मोहरा आणि कायपालट केला आहे विशेषतः शिरोळ तालुक्यातील मागासवर्गीय यांच्यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी खेचून तमाम मागासवर्गीय समाज बांधवांना दिलासा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे जयसिंगपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी क्रांती चौकात एसटी स्टँड परिसरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती उभारण्यासाठी जागा मंजुरी करून 14 एप्रिल रोजी त्या जागेत भूमिपूजन केल्याबद्दल आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर शहरातून बौद्ध बांधवांच्या वतीने हत्तीवरून मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली यावेळी जेष्ठ दलित नेते गौतम ढाले माजी नगरसेवक अनुप मधाळे धडाडीचे दलित नेते जय कडाळे युवा नेते धम्मपाल ढाले आदी प्रमुख उपस्थित होते
सुनील कुरुदंवाडेपुढे बोलताना म्हणाले तालुक्याचे नेतृत्व कसे असावे त्याचा आदर्श उदाहरण म्हणजे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे होत सर्व धर्मीयांना.बरोबर घेऊन राजकारण विरहित विकासाची गंगा गावोगावी पोहोचवणारे आजच्या कलियुगातील विकासाभिमुख व लोकाभिमुख नेतृत्व म्हटल्यास वावगे ठरू नये पानंद रस्ते गावागावाला शहराला जोडणारी प्रमुख रस्ते गावागावांमध्ये काँक्रीट करणे रस्ते गटर्स पाणीपुरवठा मागासवर्गीयांसाठी विविध योजना खेचून आणणारे शिरोळ तालुक्यातील पहिले आमदार म्हणून राजेंद्र पाटील यड्रावकर यांची गणना होते त्यांनी सुमारे वीस कोटी रुपयाचे विद्यार्थिनींचे वसतिगृह समाज मंदिरे बांधून तालुक्यात आदर्शवत कार्य चालू ठेवले आहे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा करणार अशी त्यांनी निवडणुकीच्या काळात भीम प्रतिज्ञा केली होती निवडणुकीनंतर पुतळा उभारण्या कामासाठी अहोरात्र कष्ट घेत आहेत यातूनच त्यांचे मागासवर्गीय समाज बांधावर असलेले प्रेम प्रकट होते आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यापुढेही असेच तालुक्याच्या विकास साठी भरीव कार्य करावे त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी तमाम दलित बांधवांचा श्वास आणि अस्मिता असणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती कृती पुतळा उभा करण्यासाठी त्यांनी सुरू केलेले प्रयत्न व त्यासाठी मिळवून दिलेली जागा खरोखरच त्यांनी केलेली कार्ये उल्लेखनीय आहे याकरिता दलित बांधवांच्या वतीने कुरुंदवाड शहरात त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात येणार आहे यासाठी नियोजन सुरू असल्याचे श्री कुरुंदवाडे यांनी सांगितले

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *