महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक फेडरेशन आयटक च्या वतीने वर्धा येथे गटप्रवर्तक महिलांची राज्यव्यवती परिषद संपन्न!
या परिषदेसाठी राज्यभरातून किमान 500 गटप्रवर्तक महिला उपस्थित होत्या. या परिषदेचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक संघटनेचे अध्यक्ष कॉ राजू देसले हे होते. या परिषदेमध्ये मार्गदर्शन करतांना राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉ शंकर पुजारी. यांनी सांगितले की, गटप्रवर्तक महिलांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळू पर्यंत तीव्र संघर्ष करावा लागणार आहे.
या परिषदेमध्ये महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक आयटक संघटनेचे अध्यक्ष कॉ राजू देसले, महाराष्ट्र राज्य आयटक कामगार संघटनेचे सचिव कॉम्रेड दिलीप उटाणे, कॉम्रेड दिवाकर नागपुरे, कॉ मुगाची बुरुड, कॉ प्रफुल्ल देशमुख व कॉ शबाना फर्जंद व कॉ अभुदय मेघे यांनी मार्गदर्शन केले.
महाराष्ट्रातील सर्व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे, शासकीय कर्मचारी होईपर्यंत कंत्राटी कर्मचारी म्हणून मान्यता देऊन दरमहा 26 हजार रुपये किमान वेतन मिळाले पाहिजे, असा ठराव करण्यात आला, तसेच यापुढे गटप्रवर्तकांना गटप्रवर्तक न म्हणता आशा पर्यवेक्षक म्हणावे असाही निर्णय घेण्यात आला. या व इतर प्रमुख मागण्यांच्यासाठी लवकरच पुढील महिन्यांमध्ये राज्यभर आंदोलनाची तारीख जाहीर करण्यात येईल.
परिषदेमध्ये खालील गटप्रवर्तक महिलानी गटप्रवर्तकांच्या हक्का संबंधी महत्त्वाचे मुद्दे मांडले.
त्यामध्ये कॉ वैशाली खंदारे, कॉ सविता गजभिये, कॉ विद्या कांबळे, कॉ रंजना वानखेडे, कॉ आशा चलाख, कॉ जमू गावित, कॉ सुनीता गांगुर्डे , कॉ बेबी धात्रक , कॉ सुनिता कुलकर्णी, कॉ प्रतिभा देवळे व कॉ संगीता गौतम यांनी परिषदेमध्ये महत्त्वपूर्ण भागीदारी केली.
Posted inसांगली
महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक फेडरेशन आयटक च्या वतीने वर्धा येथे गटप्रवर्तक महिलांची राज्यव्यवती परिषद संपन्न!
