सलग १८ तास अभ्यासिका उपक्रमास चांगला प्रतिसाद
— शिरोळ येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विशेष उपक्रम : अभ्यासिकेसाठी 97 विद्यार्थ्यांचा सहभाग ; मान्यवरांनी केले विशेष कौतुक
शिरोळ: प्रतिनिधी
फुले शाहू आंबेडकर विचार मंच व मातोश्री आशाई शिरोळकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने सलग १८ तास अभ्यासिका उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमात शिरोळ, सांगली जयसिंगपूर व अन्य परिसरातील सुमारे 97 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, पहाटे सहा वाजता सुरू झालेली अभ्यासिका रात्री बारा वाजता समाप्त करण्यात आली. या अभिनव उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. या अभ्यासिका उपक्रमाचे आठवे वर्ष असून सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक, कृषी व पोलीस सेवेतील मान्यवर व अधिकाऱ्यांनी भेटी देऊन मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले.
येथील श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या दत्त पॉलिटेक्निकल कॉलेज येथे जयंतीनिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून
मान्यवरांच्या हस्ते सलग अठरा तास अभ्यासिकेचे उद्घाटन झाले. यावेळी दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील, दत्त कारखाना कार्यकारी संचालक एम व्ही पाटील, दत्तचे संचालक अनिलराव यादव,
सामाजिक कार्यकर्ते खंडेराव हेरवाडे यांच्यासह
पत्रकार गणेश वाईकर, सामाजिक कार्यकर्ते राजेन्द्र दाभाडे उपस्थित होते
यावेळी संविधान जागर – सादरकर्ते अमोल पाटील यांनी मार्गदर्शन केले तर
उद्घाबोधनपर व्याख्यान डॉ युवराज पवार, डॉ. ए.टी.पाटील,डॉ उमेश कळेकर यांनी संविधान, ज्ञान आणि विज्ञान याविषयी मार्गदर्शन केले. शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, एन वाय जाधव शिक्षक नेते खंडेराव जगदाळे ,सामाजिक कार्यकर्ते दगडू माने, अशोक कांबळे , उदय कांबळे, सचेतन बनसोडे,प्रकाश कांबळे, दीपक महानाम, प्रशांत माने , चिदानदन कांबळे,राहुल कांबळे, प्रा.अर्चना शिरोळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजक प्रमुख प्रा
विजय शिरोळकर यांनी स्वागत केले. निलेश शिरोळकर यांनी आभार मानले.