वह्या व मिठाई वाटून कडधे ग्रामस्थांच्या वतीने डॉ.आंबेडकर जयंती साजरी.
महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त कडधे येथे ग्रामस्थांना मिठाई तसेच विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले.
कडधे बस स्टॉप चौक येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य प्रतिमेला ग्रामस्थांनी मेणबत्ती,अगरबत्ती प्रज्वलन करत पुष्पहार अर्पण करून जयघोष केला.
अत्यंत उत्साहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी उपस्थितांना मिठाई वाटुन आनंद साजरा करण्यात आला. तसेच बाबासाहेबांनी दिलेल्या शिक्षणाच्या संदेशाची कृतीशीलता म्हणून यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.
हा जयंती उत्सव गावचा धर्मनिरपेक्ष व एकतेचे प्रतीक असून बाबासाहेबांच्या विचारातून देशाची अखंडता कायम असून प्रगती होत आहे अशा भावना यावेळी वक्त्यांनी मार्गदर्शनात व्यक्त केल्या. माजी उपसरपंच बबनराव तुपे,संजय केदारी, शकिलभाई प्रधान, ह.भ.प सुनील महाराज वरघडे व ईश्वर ठाकर यांनी शुभेच्छा दिल्या.
प्रतिष्ठित नागरिक लक्ष्मण तिखे पाटील,दामू तुपे,संजय ठाकर, नितीन तुपे, गोरख खराडे, भरत तुपे, अमोद गांधी,राजू भाई सय्यद, याकूब मुलानी,सुभाष यादव,हिरामण यादव,मधुकर गायकवाड, बाळासाहेब चव्हाण, मालनताई यादव, मंदाताई यादव, सुवर्णाताई यादव, कोमलताई यादव, रंजनाताई चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती.
दादासाहेब यादव यांनी प्रस्ताविक केले व विकास ठाकर यांनी आभार प्रदर्शन केले.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, जिजाऊ मासाहेब, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक केदारी, संदीप तिखे,प्रवीण यादव ,किरण यादव, आकाश गायकवाड, रोहन चव्हाण, किरण चव्हाण, अविनाश चव्हाण, हर्ष गायकवाड, अथर्व सोनावणे, यश यादव, तेजस यादव व जयेश यादव यांनी विशेष परिश्रम घेतले.