सांगली जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना घरे मिळण्यासाठी सांगली सहाय्यक कार्यालय आयुक्त कार्यालयात 424 अर्ज दाखल

<em>सांगली जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना घरे मिळण्यासाठी सांगली सहाय्यक कार्यालय आयुक्त कार्यालयात 424 अर्ज दाखल</em>

सांगली जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना घरे मिळण्यासाठी सांगली सहाय्यक कार्यालय आयुक्त कार्यालयात 424 अर्ज दाखल
सहाय्यक कामगार आयुक्त श्री विशाल घाडगे यांची निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने शुक्रवारी दुपारी तीन वाजता भेट घेतली. त्यावेळेस सहायक कामगार आयुक्त श्री विशाल घाडगे यांनी अशी माहिती दिली की, सध्या सांगली जिल्ह्यामध्ये घरांच्या साठी आलेल्या अर्जांच्या पैकी 46 अर्ज मंजूर करण्यात आलेले असून लवकरच त्यांना हप्त्या हप्त्याने दोन लाखाची रक्कम मिळत जाणार आहे. तसेच मिरज येथील गोखले बिल्डर यांच्या प्रकल्पामध्ये 46 नोंदीत बांधकाम कामगारांना प्रत्येकी दोन लाख रुपये मंजूर झालेले आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांची राहिलेले उर्वरित अर्ज सुद्धा लवकरात लवकर निकाली काढण्यात येतील. असे त्यांनी निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या शिष्टमंडळास आश्वासन दिले त्याबद्दल संघटनेच्या वतीने सहायक कामगार आयुक्त श्री विशाल घाडगे यांचे आभार मानण्यात आले.
सांगलीत एक मे कामगार दिनानिमित्त सांगली मराठा सेवा संघ सभागृहामध्ये घरहक्क मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे

या नियोजित मेळाव्या संदर्भात बोलताना निवारा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष व ज्येष्ठ कामगार नेते कॉ शंकर पुजारी यांनी सांगितले की जिल्ह्यातील 70 हजार बांधकाम कामगारांच्या दृष्टीने हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे सर्व कामगारांनी या मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केलेले आहे,
तसेच मुंबई उच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार सांगलीमध्ये 357 बेघर नागरिकांनी सांगली महानगरपालिकेकडे अर्ज केले असून त्याबाबतही चार दिवसांपूर्वी आयुक्त व महापोर यांच्याबरोबर बैठक होऊन लवकरच 357 लोकांना घरकुले ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तसेच निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या शिष्टमंडळास महानगरपालिकेचे आयुक्त श्री सुनील पवार यांनी असेही सांगितले आहे की महापालिका क्षेत्रामध्ये ज्या नागरिकांना स्वतःचे घर नाही त्या सर्वांनी एकत्र येऊन महानगरपालिकेकडे घरासंबंधी मागणी केल्यास त्यांचा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल. त्याबाबतही सविस्तर माहिती या मेळाव्यामध्ये एक मे रोजी देण्यात येणार आहे.
सध्या नोंदीत बांधकाम कामगारांना दोन लाख रुपये ग्रामीण भागामध्ये मिळण्यासाठी 700 पेक्षा जास्त अर्ज दाखल झालेले असून ते अर्ज लवकर मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान आठ अ उतारा बद्दल काही प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याच्याबाबत माहिती एक मे कामगार दिनामध्ये माहिती देण्यात येईल.
कामगार मंत्री श्री सुरेश भाऊ खाडे यांनी तीन महिन्यांपूर्वी असे जाहीर केलेले आहे की, सांगली जिल्ह्यातील 70 हजार नोंदीत बांधकाम कामगारांना शासन घरकुले देणार! त्याबाबतही एक सर्वे शासनाकडुन सध्या शहरातील घरे नसणाऱ्या लोकांचा सुरू आहे. त्याची सुद्धा सद्यस्थिती काय आहे याबाबत मेळाव्यामध्ये माहिती देण्यात येणार आहे.
संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये ज्यांना स्वतःला मालकीचं राहायचं घर नाही त्यांना घरासाठी शासनाने जमीन द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आलेली आहे. एक महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी यांनी शिष्टमंडळास असे आश्वासन दिलेले आहे की संघटनेने ज्या ठिकाणी सरकारी जागा असेल अशा ठिकाणाच्या जागेच्या माहितीसह ज्यांना घर पाहिजे आहे त्यांची यादी द्यावी असे झाल्यास पुढील कारवाई करण्यात येईल.
म्हणून सांगली जिल्ह्यातील ज्यांना राहायला स्वतःचे पक्के घर नाही त्यांना पक्के घर मिळवून देण्यासाठी एक मे रोजी मेळाव्यामध्ये निश्चित धोरण ठरवून पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.
निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने साहेब कामगार आयुक्त यांना दिलेल्या निवेदनाच्या वेळेस कॉ शंकर पुजारी, कॉ विशाल बडवे,
को चंद्रकांत वाघमारे, कॉ रवींद्र जगताप, कॉ ओंकार राजपूत, कॉ वैभव बडवे व कॉ रणजीत लोंढे इत्यादी उपस्थित होते. तरी एक मे च्या महत्त्वपूर्ण बांध घरक मेळाव्यासाठी सांगली जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे पत्रक निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या जनरल सेक्रेटरी प्राध्यापिका शरयू बडवे यांनी प्रसिद्धस दिलेले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *