इचलकरंजी व परिसरातील मुस्लिम बांधवांनी रमजान ईद मोठ्या उत्साहात केली साजरी

इचलकरंजी व परिसरातील मुस्लिम बांधवांनी रमजान ईद मोठ्या उत्साहात केली साजरी

इचलकरंजी/प्रतिनिधी –

इचलकरंजी व परिसरातील मुस्लिम बांधवांनी शनिवारी पवित्र रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली. येथील स्टेशन रोडवरील ईदगाह मैदान येथे सामुहिक नमाज पठण करण्यासाठी मोठ्या संख्येने समाज बांधव जमले होते. यावेळी जागतिक शांततेसाठी व सर्व संकटे दूर होण्यासाठी दुवापठण करण्यात आले. नमाजनंतर एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, हातकणंगले तहसीलदार कल्पना ढवळे,महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक निकेश खाटमोडे, पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैजने, सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे विकास आडसुळ यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

मुस्लिम समाजात रमजान ईद सर्वात मोठा सण मानला जातो. यादिवशी ईदगाह मैदान येथे सामुहिक नमाज पठण केले जाते. मोठ्या संख्येने ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी जमले होते   टाकवडे येथील मदिना मस्जिद चे इमाम मौलाना शमशुद्दीन शेख यांनी बयान पठण तर खुतबा व दुवा पठण कबनूर दावतनगर मस्जिदचे इमान काझी मुझमीर मुल्ला यांनी केले. हजरत सय्यद मखतूमवली दर्गा ट्रस्ट, जामा मस्जिद व इदगाह ट्रस्ट यांचेवतीने नियोजन करण्यात आले होते. बादशाह बागवान व अहमद मुजावर यांनी आभार मानले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली होती.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *