हिंदू मुस्लिम ऐक्य, कोल्हापूर थाळी, सर्वधर्मिय समिती तर्फे शिव-बसव जयंती व रमजान ईद साजरी
कोल्हापूर : प्रतिनिधी कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्मारक चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती, रमजान ईद व जगतज्योती, क्रांतीसुर्य महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त अॅड. धनंजय पठाडे यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना कोल्हापूर हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असल्यामुळे आज कोल्हापुरात आपण सर्व धर्मीयांतर्फे शिव-बसव जयंती व रमजान ईद राष्ट्रीय एकात्मता म्हणून साजरा करत असल्याचे अॅड. धनंजय पठाडे यांनी सांगितले.
कोल्हापूर थाळीचे प्रमुख उदय प्रभावळे यांनी गरजूंना भोजन वाटप केले.
यावेळी धर्मदाय उपायुक्त शिवराज नायकवडी, एक्साईजचे सीनियर इन्स्पेक्टर पी.आर. पाटील,एम.आय.डी.सी.चे उप अभियंता इराप्पा नाईक, अमोल कुरणे, क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय साळवे,जमजम फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज सतारमेकर, राष्ट्रीय खेळाडू डाॅ.प्राजक्ता सूर्यवंशी,निवास सुर्यवंशी आदी परिवर्तन फाउंडेशन, क्रांतीगुरु लहुजी साळवे प्रतिष्ठान व जमजम फाउंडेशन चे पदाधिकारी उपस्थित होते.