बी.आर.एस. पार्टीची महाराष्ट्रातील सोशल मीडिया कार्यकारिणी जाहीर..!आता फक्त एकच निर्धार, महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे सरकार

बी.आर.एस. पार्टीची महाराष्ट्रातील सोशल मीडिया कार्यकारिणी जाहीर..!आता फक्त एकच निर्धार, महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे सरकार

बी.आर.एस. पार्टीची महाराष्ट्रातील सोशल मीडिया कार्यकारिणी जाहीर..!
आता फक्त एकच निर्धार, महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे सरकार

मुंबई . (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) – भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र राज्यात आपले जाळे विस्तारत आहे. त्या पार्श्वभूमी राजकीय आणि मीडिया या क्षेत्रातील नियुक्त्यांना वेग आला असून नुकत्याच महाराष्ट्र राज्यातील सोशल मीडिया प्रभारी, महाराष्ट्र मिडिया समन्वयक, विभागीय व जिल्हा समन्वयक यांची नियुक्या करण्यात आल्या आहेत अशी माहिती भारत राष्ट्र समितीचे सोशल मीडियाचे राष्ट्रीय प्रभारी जयंत देशमुख यांनी दिली आहे.

यावेळी सोशल मीडिया राज्य प्रभारी उदयराव घाटगे, सोशल मीडिया समन्वयक शशिकांत ससाणे व चिन्मय जोशी तर सोशल मीडिया सदस्य म्हणून प्रकाश चव्हाण, राहुल कोळसे, प्रशांत नवगिरे, निखिल राखोंडे, गौरव इंगळे, योगेश राठोड, गुरुप्रसाद सावंत यांचा समावेश आहे. तसेच, विभागीय सोशल मीडिया प्रसारक म्हणून मराठवाडा तून अशोक विधाते, उत्तर महाराष्ट्र प्रकाश चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र सुशांत कांबळे, अमरावती विभाग गणेश कपाटे , नागपूर विभाग आकाश सुखदेवे , मुंबई विभागा करीता महेंद्र कणसे व रवींद्र रोकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर जिल्हानिहाय सोशल मीडिया समन्वयक म्हणून प्रकाश चव्हाण नाशिक, प्रवीण बेंद्रे अहमदनगर , शाहरुख पटवे धुळे , सचिन बनसोडे जळगाव , निखिल पवार नंदुरबार,जितेंद्र झाळखंडे अमरावती, स्वप्नील जोड अमरावती, प्रशांत भाटकर अकोला, अक्षय वानखाडे बुलढाणा, दुर्गादास चिन्ने यवतमाळ, रितेश देशमुख वाशिम, श्रीमती पूजा वाघमारे मुंबई, परशुराम वासवानी मुंबई ,श्रीमती अर्चना थोरात पाटील ठाणे ,विष्णू पाटील ठाणे, चेतन मानसा पालघर ,महेंद्र कणसे रायगड, गुरुप्रसाद गवळी रत्नागिरी ,महेश कांबळे सिंधुदुर्ग, शुभम क्षीरसागर पुणे ,निखिल देशमुख पिंपरी चिंचवड, विवेक पाटील सांगली, शुभम पाटील सांगली ,सचिन पाटील सातारा ,दगडू कांबळे सोलापूर, अभिजीत मोहिते कोल्हापूर, श्रीमती प्रिया राऊत नागपूर, हेमंत मलेवार भंडारा ,आकाश सुखदेवे चंद्रपूर, विनोद देवधरे गडचिरोली, अमर मेरगेवार गोंदिया, राहुल मून वर्धा, उमर शेख छत्रपती संभाजीनगर सचिन जाधव बीड, संतोष बधे बीड, सौरभ म्हस्के जालना, मोहन जाधव धाराशिव ,सत्यजित जोंधळे नांदेड, दीपक पाटील नांदेड, प्रवीण मुसांडे लातूर ,आतिष गरड परभणी, फिरोज शेख हिंगोली यांची निवड करण्यात आली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण देशभर जाळे तयार करणार – जयंत देशमुख

बीआरएस पक्षाचे राष्ट्रीय सोशल मीडिया प्रभारी जयंत देशमुख यांनी सांगितले की, आम्ही सर्व सोशल मीडिया नियुक्ती केली आहे.आता प्रत्येक घराघरात पक्षाचे नाव पोहोचले आहे. यासाठी घराघरात नाव पोहोचले की तेलंगणाचे विकसीत मॉडेल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांनी आठ ते नऊ वर्षांत जे काम केले आहे त्यांची चर्चा महाराष्ट्रात आहे.येत्या काळात सोशल मीडिया माध्यमातून आम्ही महाराष्ट्र बरोबर संपूर्ण देशभर जाळे तयार करून त्याचप्रमाणे देशात सरकार बनविण्यासाठी तयार होत आहे असे देशमुख यांनी सांगितले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *