प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र
मणिपूर महिलांची विटंबना, हिंसाचार यांचा धिक्कार, राष्ट्रपती शासन लावण्याची व
कठोर कारवाई करण्याची मागणी यासाठी २५ जुलै रोजी राज्यात सर्वत्र आंदोलन –
राज्यातील प्रागतिक पक्षांच्या वतीने आवाहन
मुंबई दि. २३ – मणिपूर राज्यात ४ मे रोजी तीन महिलांची विवस्त्र धिंड काढून माणूसकीला व देशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. सदरची घटना होवून अडीच महिने उलटले तरीही याबाबत प्रसार माध्यमासह सर्वच ठिकाणी मौन बाळगण्यात आले. मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी मणिपूर मध्ये अशा प्रकारची शेकडो प्रकरणे होतात असे बेताल वक्तव्य केले. अडीच महिन्यांत हिंसाचारात १५० बळी गेले, ६० हजार लोक बेघर झाले, ५ हजार जाळपोळी झाल्या, तरीही पंतप्रधान एक अक्षरही बोलले नाहीत. मा. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर नाईलाजाने कारवाईची घोषणा केली. या सर्वच घटना अत्यंत वेदनादायक व संपूर्ण देशाला शरमेने मान खाली घालायला लावणाऱ्या आहेत. महाराष्ट्रातील सर्व प्रागतिक पक्षांनी एकत्रितरीत्या “मणिपूर मधील या सर्व घटनांचा धिक्कार करावा. मणिपूर राज्यातील नराधमांवर कठोर कारवाई त्वरीत करावी व मणिपूर येथे हिंसाचार रोखण्यासाठी त्वरीत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी” या मागण्यांसाठी सर्वत्र स्थानिक पातळीवर निदर्शने करण्यात यावीत असे आवाहन महाराष्ट्र राज्यातील प्रागतिक पक्षांच्या वतीने संयुक्त रीत्या करण्यात आले आहे. प्रागतिक पक्षांच्या या आघाडीमध्ये राज्यातील शेतकरी कामगार पक्ष, जनता दल (सेक्युलर) महाराष्ट्र, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, स्वाभिमानी पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटना, मार्क्सवादी कम्यनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, समाजवादी पार्टी महाराष्ट्र, बहुजन विकास आघाडी, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, लाल निशाण पक्ष, भाकपा (माले) लिबरेशन पार्टी, रिपाई (सेक्युलर) पार्टी व श्रमिक मुक्ती दल हे तेरा घटक पक्ष सहभागी आहेत.
दि. १ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद मोदी हे पुणे येथे येणार आहेत. त्यावेळी पंतप्रधानांसमोर काळे झेंडे दाखविण्याचा व निदर्शने करण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.
मुंबई येथे या तेरा घटक पक्षांची बैठक आज शेतकरी कामगार पक्ष कार्यालयात झाली. कॉ. अशोक ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला कॉ. ऊदय नारकर, कॉ. सुभाष लांडे, प्रा. एस व्ही जाधव, प्रताप होगाडे, संदीप जगताप, राहुल गायकवाड, एड. राजबर, कॉ. विजय कुलकर्णी, कॉ. अजीत पाटील, महेंद्र पंडागळे, किशोर ढमाले, अनिस अहमद, कॉ. एस के रेगे, कॉ. मधुकर कदम, दिपक चौगुले, एड. राजेंद्र कोरडे, कॉ. शैलेंद्र कांबळे, मिलिंद गायकवाड, कॉ. शाम गोहिल, प्रभाकर नारकर इ. पक्ष प्रतिनिधी उपस्थित होते.
क