महाराष्ट्रात आरोग्य कायदा व्हावा म्हणून प्रयत्न करणार — नाना पटोले

महाराष्ट्रात आरोग्य कायदा व्हावा म्हणून प्रयत्न करणार — नाना पटोले

महाराष्ट्रात आरोग्य कायदा व्हावा म्हणून प्रयत्न करणार — नाना पटोले

मुंबई दिनांक २५ ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्यात राजस्थान आणि छत्तीसगड प्रमाने आरोग्य कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणार.त्यासाठी विधानसभेत विधेयक आणून आरोग्य व्यवस्थेसाठी बजेटही वाढवून घेऊ असं स्पष्ट आश्वासन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली मुंबईच्या आझाद मैदान येथील आंदोलनकर्त्यांना दिले. शिवसेना नेते सचिन अहिर यांनीही आंदोलन स्थळी भेट देऊन आपली मुंबईच्या मागण्या गंभीरपणे घेणार असल्याचे सांगितले.
आपली मुंबई संघटनेच्यावतीने आरोग्य व्यवस्थेमधील सुधारणांसाठी आझाद मैदान येथे आज दिनांक 25 रोजी प्रतिकात्मक धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनाला मुंबईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.राज्यात सर्वांना सर्व तऱ्हेची आरोग्य सुविधा मोफत मिळावी.तसेच प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक मल्टीस्पेशलिटी रुग्णालय उभारण्यात यावे आदी मागण्यांसाठी सदर आंदोलन करण्यात आल्याचे आपली मुंबईचे निमंत्रक संजय शिंदे यांनी सांगितले.
संघटनेतर्फे ‘आपली मुंबई, आपले आरोग्य’ हि मोहीम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
‘आपली मुंबई’चे जॉन अलमेडा, ओमप्रकाश पासी, श्रीधर क्षीरसागर, ज्ञानेश पाटील, जनता दलाचे राज्य महासचिव रवि भिलाणे, मुंबई सचिव ज्योती बडेकर, वैशाली सावंत, दिलीप गाडेकर, सीमा बोराडे, कलाताई चोळके,मनोहर राजगुरू, खुर्शीद,अमित बिडलान आदी विविध प्पक्ष संघटनांचे प्रतिनिधी यावेळी आवर्जून उपस्थित होते.

मागण्या :
१). सर्वांना मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात.
२). महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक सर्वसोयी सुविधा युक्त सर्व प्रकरच्या रुग्णांकरिता मोफत रुग्ण सेवा उपलब्ध होईल असे रुग्णालय उभारले जावे.
३). सध्या मुंबईसह महाराष्ट्रभरात असलेल्या आरोग्य सुविधेत सुधारणा केली जावी.
४). सर्व आजारा संदर्भात आवश्यक त्या सर्व तपासण्याची सोय तसेच आवश्यक औषधोपचाराची
सोय ही शासना मार्फतच होईल याची राज्य शासनाने हमी घेवून त्या संदर्भात त्याच्या अमंलबजावणी साठी आवश्यक यंत्रणा उभी करावी.
—————

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *