आशा व गटप्रवर्तक महिलांचा सांगली जिल्हा परिषद कार्यालयावर भर पावसात धडक मोर्चा!

आशा व गटप्रवर्तक महिलांचा सांगली जिल्हा परिषद कार्यालयावर भर पावसात धडक मोर्चा!


महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या(आयटक) वतीने ठीक दुपारी बारा वाजता महात्मा गांधींच्या पुतळ्यापासून स्टेशन चौकातून मोर्चास सुरुवात झाली. मोर्चामध्ये महाराष्ट्रातील 70000 आशा व गटप्रवर्तक महिलांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे! जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत दरमहा 25 हजार रुपये वेतन मिळाले पाहिजे! आशा व गटप्रवर्तक महिलांना सहा महिने बाळंतपणाची रजा मिळाली पाहिजे! एक महिना आजारीपणाची रजा मिळाली पाहिजे ! मोर्चामध्ये इत्यादी घोषणा जोरदारपणे देण्यात येत होत्या.
त्याचबरोबर हम फुल नही चिंगारी है भारत कि नारी है! मनिपुर मधल्या महिलांच्यावर अत्याचार करणाऱ्यांना नराधमाना फाशी द्या?जातीयवादी मणिपूर सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा!मणिपूरच्या अत्याचाराला जबाबदार असणाऱ्या भाजपा सरकारचा धिक्कार असो! महिला एकजुटीचा विजय असो! इन्कलाब जिंदाबाद! आयटक जिंदाबाद! इत्यादी घोषणा देण्यात आल्या.
मोर्चा जिल्हा परिषदवर आल्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामधील मागण्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी बैठक आयोजित करण्याबाबतचे आश्वासन उपमुख्य जिल्हा कार्यकारी अधिकारी यांनी शिष्टमंडळास दिले.
निवेदन दिल्यानंतर मोर्चासमोर झालेल्या सभेमध्ये बोलताना महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कॉ शंकर पुजारी यांनी सांगितले की सन 2005 सालापासून महाराष्ट्रामध्ये आशा व गटप्रवर्तक महिला काम करीत आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करणाऱ्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या साठी सुधारित वेतनश्रेणी महाराष्ट्र शासनाने लागू केलेली आहे. परंतु जाणीवपूर्वक गटप्रवर्तक महिलांना सुधारित वेतनश्रेणी लागू केलेली नाही. हे अत्यंत अन्यायकारक आहे.कार्यापासून सुधारित वेतनश्रेणी घटप्रवर्तकांना ताबडतोब लागू करा अशी मागणी करण्यात आली अशा गटप्रवर्तक महिलांना आज दरमहा पाच हजार रुपये मानधन दिले जात परंतु वाढत्या महागायच्या काळामध्ये ते 25 हजार रुपये मिळाले पाहिजे मागील पाच वर्षापासून भारत सरकारने आशा व गटप्रवर्तक महिलांना त्यांच्या मानधनांमध्ये वाढ केलेली नाही ग्रामीण भागापेक्षा सुद्धा शहरी भागातील अशांना जास्त काम लावली जाते परंतु कामाचा मोबदला दिला जात नाही अशा गटप्रवर्तक महिलांना ज्या कामाचा मोबदला दिला जात नाही अशी ही कामे सांगितली जात आहेत यानंतर सुमन पुजारी यांनी बोलताना सांगितले की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र कामगार अशा कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने मुंबईसह आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनामध्ये जर शासनाने मागण्या मान्य केला नाहीत तर नऊ ऑगस्ट पासून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला त्या मोर्चाचे नेतृत्व विद्या कांबळे राधिका राजमाने अफसाना शिकलगार अंजुम मुजावर छाया पाटील चांदणी साळुंखे संगीता जगदाळे सविता देवकुळे स्मिता पाटील अर्चना कलगुडगी

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *