माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आत्मक्लेश अन्नत्याग सत्याग्रहाला पाठिंबा ; सर्व पुरोगामी राजकीय पक्ष व संस्था संघटना यांच्या संयुक्त बैठकीत निर्णय

माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आत्मक्लेश अन्नत्याग सत्याग्रहाला पाठिंबा ; सर्व पुरोगामी राजकीय पक्ष व संस्था संघटना यांच्या संयुक्त बैठकीत निर्णय

(क

इचलकरंजी ता.२६ मणिपूर मध्ये घडलेली घटना आणि तेथे पेटत असलेले वातावरण देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेला व संवैधानिक मूल्यांना धक्का पोहोचवणारे आहे. त्यामुळे या घटनेचा तीव्र धिक्कार ही बैठक करत आहे. त्याच पद्धतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आत्मक्लेश अन्नत्याग सत्याग्रहाला पाठिंबा देऊन निमित्ताने आयोजित केलेल्या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी होण्याचा ठराव
सर्व पुरोगामी राजकीय पक्ष व संस्था संघटना यांच्या संयुक्त बैठकीत करण्यातआला. या बैठकीत विविध पक्ष व संघटनांच्या प्रतिनिधींनी आपली मते व्यक्त केली. स्वागत व प्रास्ताविक सदा मलाबादे यांनी केले.
तसेच इचलकरंजी नगरपालिकेमधील कामाविना बिले अदा झाल्याची उघडकीस आलेली उदाहरणे ही इचलकरंजी महानगरपालिका व शहराला बदनाम करणारी असून त्यात सहभागी असलेल्या सर्व भ्रष्टाचार यांची सखोल चौकशी होऊन त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणीही या बैठकीत करण्यात आली .त्याच पद्धतीने इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावर नेमकेपणाने तोडगा निघावा यासाठी लवकरच एक व्यापक बैठक घेण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.समाजवादी प्रबोधिनीत झालेल्या या बैठकीत मदन कारंडे,प्रताप होगाडे ,जयकुमार कोले,प्राचार्य ए .बी.पाटील,हणमंत लोहार,सयाजी चव्हाण,सुनील बारवाडे,डी एस. डोणे , आनंदराव चव्हाण,प्रा.अशोक कांबळे,पद्माकर तेलसिंगे,बजरंग लोणारी,सदा मलाबादे,अरविंद धरणगुत्तिकर,प्रा.रमेश लवटे, सुनिल स्वामी,रोहित दळवी,अभीमन्यू कुरणे, उज्वला जाधव ,प्रसाद कुलकर्णी आदीनी मनोगते व्यक्त केली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *