जे. जे. मगदूम अभियांत्रिकी मध्ये शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न
जयसिंगपूर येथील डॉ.जे.जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये प्रति वर्षाप्रमाणे शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहाने साजरा करण्यात आला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती राजे शिवाजी यांची जयंती प्रत्येक वर्षी महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांच्या उदंड प्रतिसादाने संवाद्य मिरवणुकीने साजरी होत असते.
तथापि यावर्षी सुद्धा तशाच पद्धतीने
संवाद मिरवणूक, मिरवणुकीमध्ये राम, लक्ष्मण,सीता,हनुमान यांच्या जिवंत देखाव्याचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. शिवछत्रपतींचे, राजमाता जिजाऊ, व सईबाई ची भूमिका पण विद्यार्थ्यांनी जिवंत देखाव्यातून जनतेसमोर दाखवून दिली. दिनांक १८/२/२०२४ रोजी सायंकाळी सहा वाजता महाविद्यालय प्रांगणात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली त्यानंतर दीपोत्सव साजरा करण्यात आला तत्पूर्वी या सोहळ्यास १४ फेब्रुवारीच्या आयोजित रक्तदान सोहळ्याने सुरुवात झाली होती.
डॉ.जे.जे. मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम व्हाईस चेअर पर्सन डॉ. सोनाली मगदूम, कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे यांच्या प्रोत्साहनातून व प्राचार्या शुभांगी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन डीन स्टुडंट्स प्रा. पी. पी. पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख डी. आर. माने यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने केले होते. कार्यक्रम यशस्वीकरण्यासाठी विद्यार्थ्यांच्यामधून कु. ओंकार माने आणि मोलाचे योगदान दिले. महाविद्यालयीन स्टाफ कडून प्रा. व्ही. टी. कांबळे, विनायक चव्हाण, चेतन माने, बीएन कुंभार, नवनाथ पुजारी व किशोर गुळवे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Posted inकोल्हापूर
जे. जे. मगदूम अभियांत्रिकी मध्ये शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न
