आशा व गटप्रवर्तक महिलांना मानधन वाढीचा शासकीय आदेश मिळेपर्यंत महाराष्ट्रामध्ये 76 हजार महिला संपावर राहूनच आझाद मैदान मध्ये तीव्र आंदोलन सुरूच ठेवणार!
14 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितले होते की मंत्रिमंडळामध्ये आशा व गटप्रवर्तक महिलांच्या मानधन वाढीच्या विषयी चर्चा होऊन त्याबाबत सविस्तर अहवाल मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर यांना देण्यास सांगितले होते. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर नितीन करीर यांनी मानधन वाढ बाबत अहवाल महाराष्ट्र शासनाकडे सादर केलेला आहे. परंतु तरीसुद्धा महाराष्ट्र शासनाने अद्याप मानधन वाढीचा निर्णय घेतलेला नाही.
मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी अशा आणि गटप्रवर्तकांच्या संपा संदर्भात मानधन वाढीचा शासकीय आदेश निघेल अशी अपेक्षा होती. परंतु महाराष्ट्रातील 70000 अशा व गटप्रवर्तक महिलांची निराशा महाराष्ट्र शासनाने केलेली असून त्यांच्यामध्ये अशा व गटप्रवर्तक महिलांच्या मानधन वाढ बाबत निर्णय घेण्याची इच्छाशक्ती दिसून येत नसल्यामुळे या महाराष्ट्र शासनाविरुद्ध महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिलांच्या मध्ये प्रचंड असंतोष वाढत चाललेला आहे. अशी प्रतिक्रिया कॉ शंकर पुजारी यांनी आझाद मैदान मधील जाहीर सभेमध्ये बोलताना व्यक्त केली.
कॉ शंकर पुजारी आणि जाहीर सभेमध्ये असेही स्पष्ट केले की महाराष्ट्र हे असे सरकार आहे की संपूर्ण देशामध्ये आरोग्य संबंधीचे एकुण बजेट महाराष्ट्राचे फक्त चार टक्के आहे म्हणजे देशात सर्वात कमी आहे. दुसऱ्या बाजूस दिल्ली राज्य सरकारचे 13 टक्के बजेट आरोग्य संबंधी असल्यामुळे आज दिल्ली शहरांमध्ये सर्व औषध उपचार पूर्णपणे मोफत आहेत.
महाराष्ट्रामध्ये देखील सध्या आरोग्यावरील बजेट किमान दुप्पट करणे आवश्यक आहे. तशी मागणी आम्ही महाराष्ट्र शासनाकडे करीत आहोत.असे झाल्यास महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिलांना दरमहा 26 हजार रुपये किमान वेतन देने महाराष्ट्र शासनास शक्य आहे.
दरम्यान महाराष्ट्रातील अशा गटप्रवर्तक कामगार संघटना संयुक्त कृती समितीची मीटिंग होऊन अशा व गटप्रवर्तक महिलांचा संप जोपर्यंत शासन निर्णय होणार नाही तोपर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय करून आझाद मैदान मधील आंदोलन महिलांचे दररोज सुरूच राहणार आहे.
तरी या महत्त्वपूर्ण आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांनी सातत्याने जोरदार भागीदारी करावी आणि आपला संप 100% चालू ठेवावा असे आवाहन कॉ शंकर पुजारी यांनी आझाद मैदान येथील झालेल्या सभेमध्ये व्यक्त केले.
आझाद मैदान येथील आंदोलन मध्ये कामगार संघटना कृती समितीचे प्रतिनिधी कॉ राजू देसले, कॉम्रेड दत्ता देशमुख, कॉ भगवान दवणे, कॉ आरमायटी कॉ आनंदी अवघडे कॉ विनोद झोडगे, कॉ मुगाजी बुरूड,इंदुमती यलमर, विजया शिंदे, विद्या भालेकर, संचीता चव्हाण इत्यादींनी महत्त्वपूर्ण भागीदारी केली.
Posted inमुंबई
आशा व गटप्रवर्तक महिलांना मानधन वाढीचा शासकीय आदेश मिळेपर्यंत महाराष्ट्रामध्ये 76 हजार महिला संपावर राहूनच आझाद मैदान मध्ये तीव्र आंदोलन सुरूच ठेवणार!
