
कोल्हापूर : संत रोहीदास महाराज यांनी सामाजिक भेदभाव नष्ट करून एकतेला प्रोत्साहन दिले असे प्रतिपादन पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले यांनी केले
पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने संत रोहिदास महाराज यांची 647 वी जयंती कोल्हापुर सुभाष नगर येथील संत रोहिरास महाराज स्मारक येथे साजरी करण्यात आली .
यावेळी संत रोहिदास महाराज यांच्या पुतळ्यास आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉक्टर योगेश साळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
संतोष आठवले पुढे म्हणाले ,
संत रोहिदास हे सुधारक संतांमध्ये अग्रणी होते. तत्कालीन प्रचलित सामाजिक विद्वान होते. त्यांच्या गुरुग्रंथ साहिबमध्ये असलेल्या रचना आजही लोकप्रिय आहेत.
रविदासांच्या भक्तिगीतांचा भक्ति चळवळीवर पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या प्रदेशात गुरू (शिक्षक) म्हणून कायमचा प्रभाव पडला आहे
रविदास यांनी जाती आणि लिंगयांच्यामधील सामाजिक भेदभाव हटविण्यास आणि वैयक्तिक आध्यात्मिक स्वातंत्र्य मिळवण्याच्या प्रयत्नात एकतेला प्रोत्साहन दिले.
रविदासांचे जीवन विविध प्रकारच्या सामाजिक आणि आध्यात्मिक विषयांना अभिव्यक्त करण्याचे साधन देते.
यावेळी पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे कोल्हापुर जिल्हा अध्यक्ष जयसिंग कांबळे , परिर्वन फौंडेशनचे अध्यक्ष अमोल कुरणे , भुपाल शेटे माजी उपमहापौर , दुर्वास कदम चेअरमन इंदुमतीदेवी बोर्डिंग ‘आरोग्य व कुटुंब कल्याण
प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ . योगेश साळे , डॉ महादेव माने डॉ. अनुष्का वाईकर वाईकर , निवास सुर्यवंशी श्याम पाखरे आदीच्या सह संत रोहीदास प्रेमी उपस्थित होते

