महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिलांचा बेमुदत संप त्याचबरोबर आझाद मैदान येतील आंदोलन तीव्र करणार!
बजेट अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाचे नेते श्री विजय वडेट्टीवार यांनी आशा व गटप्रवर्तकांच्या संपाचा उल्लेख करून त्यांच्या मागण्या त्वरित मंजूर कराव्यात अशी मागणी केली.
परंतु या प्रश्नाला अर्थमंत्री अजित पवार यांनी सरळ उत्तर दिले नाही. किंबहुना अजित पवार यांच्या वक्तव्यामधून त्यांनी या 76 हजार महिलांची चेष्टाच केलेली आहे.
आमचे अजित पवार यांना आव्हान आहे की सध्या भारतात सर्वात कमी सार्वजनिक आरोग्यावर मागील वर्षी एकूण बजेटच्या फक्त चार टक्के खर्च धरलेला आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागासाठी चार टक्क्या ऐवजी 8% बजेट धरावे म्हणजे इतर सुविधाही नागरिकांना मिळतील. आणि योजनाकर्मी कर्मचाऱ्यांना मानधन वाढही करता येईल.
परंतु बजेटमध्ये सुधारणा करण्याचा जो नागरिकांचा हक्क आहे तो या खोके घेतलेल्या सरकारला मान्य नाही.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाकडे सन 22 आणि 23 मधील 5654 कोटी रुपये इतके बजेट होते. त्यामधील ऑक्टोबर 2023 पर्यंत फक्त तेराशे कोटी रुपये खर्च झाले. म्हणजे राहिलेली रक्कम अद्याप शिल्लकच आहे. दुसऱ्या बाजूस आशा गटप्रवर्तक यांच्या सर्व प्रोग्राम वर फक्त वर्षाला साडेतीनशे कोटी रुपये खर्च करतात .त्यामध्ये 76 हजार आशा महिलांचा समावेश आहे. जर ही तरतूद डबल केली तर 700 कोटी पेक्षा जास्त रक्कम लागणार नाही. आणि काहीही इतर गोष्टी न करता सुद्धा महाराष्ट्र शासनाला आशा व गटप्रवर्तक महिलांना प्रत्येकी दरमहा सात हजार रुपये व गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये मानधन वाढ देणे सहज शक्य आहे.
परंतु या सरकारची आशा व गटप्रवर्तक महिलांना घोषित केलेली मानधन वाढ सुद्धा द्यायची इच्छाशक्ती नसल्यामुळे नाईलाजस्तव आशा आणि गटप्रवर्तक महिलांना आपला संप सुरू ठेवावा लागलेला आहे.
तरी महाराष्ट्रातील सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांनी चिवटपणे आपला संप सुरू ठेवून आझाद मैदान येतील आंदोलन तीव्र करावे असे आवाहन करणारे पत्र अखिल भारतीय आशा गटप्रवर्तक आयटक फेडरेशन राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्येष्ठ कामगार नेते कॉ. शंकर पुजारी यांनी पत्रक प्रसिद्धस दिलेले आहे.
Posted inमुंबई
महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिलांचा बेमुदत संप त्याचबरोबर आझाद मैदान येतील आंदोलन तीव्र करणार!
