शिरोळ तहसीलदार कार्यालयातील महसुल सहायक शिवाजी इटलवार व जयसिंगपूर तलाठी स्वप्नील घाटगे यांनी केली 27500 रुपये लाचेची मागणी ; जयसिंगपुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

शिरोळ तहसीलदार कार्यालयातील महसुल सहायक शिवाजी इटलवार व जयसिंगपूर तलाठी स्वप्नील घाटगे यांनी केली 27500 रुपये लाचेची मागणी ; जयसिंगपुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

शिरोळ तहसीलदार कार्यालयातील महसुल सहायक शिवाजी इटलवार व जयसिंगपूर तलाठी स्वप्नील घाटगे यांनी केली 27500 रुपये लाचेची मागणी

जयसिंगपुर :क्षेत्रफळ दुरुस्ती करून सात बारा उतारा मिळणेकरिता 27,500 रुपयेची लाचेची मागणी केल्या प्रकरणी शिरोळ तहसीलदार कार्यालयातील महसुल सहायक शिवाजी इटलवार व जयसिंगपूर तलाठी स्वप्नील घाटगे यांचे विरुद्ध जयसिंगपुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला .

तक्रारदार यांचे संबंधितांचे जयसिंगपूर येथील डवरी वसाहतीत असलेल्या प्लॉटच्या क्षेत्रफळामध्ये तफावत असल्याबाबत केलेल्या अर्जाचे कामकाज हे तक्रारदार पाहत होते तरी सदरचा तक्रार अर्ज हा जयसिंगपूर येथील तलाठी(आरोपी क्र.01) यांचेकडे दिला होता. सदर क्षेत्रफळ दुरुस्ती करून सात बारा उतारा मिळणेकरिता तलठी घाटगे यांनी तहसीलदार शिरोळ यांच्याकरिता तसेच तहसील कार्यालय येथील क्लार्क इटलवार यांच्याकरिता व खाजगी टायपिस्ट यांच्याकरीता तक्रारदार यांच्याकडे 27,500/-₹ ची मागणी केली होती इटलावार यांनी तलाठी घाटगे यांनी सांगितलेप्रमाणे तक्रारदार यांच्याकडे 5,000/-₹ ची मागणी केली आहे
स्वप्नील वसंतराव घाटगे, वय – 39 वर्षे. पद – तलाठी, सजा जयसिंगपूर, ता.शिरोळ,जि. कोल्हापूर वर्ग -03 रा. रुकडी, ता.हातकणंगले, जि. कोल्हापूर,
शिवाजी नागनाथ इटलावार वय 32 वर्षे, पद- महसुल सहायक, तहसीलदार कार्यालय शिरोळ, वर्ग-03, सध्या रा. राजू नाईकवडी यांचे घरी भाड्याने कसबा बावडा,कोल्हापूर, मुळ रा. कुंडलवाडी, ता.बिलोली, जि.नांदेड आरोपीं विरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची कारवाई सुरू आहे.
सदरची कारवाई सरदार नाळे.(पोलीस उप अधीक्षक) यांच्या नेतृत्वाखालील सापळा पथक श्रीमती आसमा मुल्ला, पोलीस निरीक्षक सपोफो प्रकाश भंडारे,पोहेकॉ अजय चव्हाण,पोहेकॉ विकास माने,पोना सुधीर पाटील,पोना सचिन पाटील,पोकॉ संदीप पवारचापोहेकॉ / सूरज अपराध, विष्णू गुरव ला.प्र.वि.कोल्हापूर. आदीनी केले या करिता अमोल तांबे,(पोलीस अधीक्षक) लाप्रवि,पुणे.
(मोबा.9922100712) श्रीमती शितल जानवे (अपर पोलीस अधीक्षक) लाप्रवि पुणे.(मोबा.9921810357. विजय चौधरी.(अपर पोलीस अधीक्षक) लाप्रवि पुणे.
(मोबा. 9607323232) आदी वरिष्ट अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले .





Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *