शिरोळ प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार युवक जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर सकट यांच्या वतीने मा जलसंपदा मंत्री श्री जयंतराव पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्ध महिलांना साडी वाटप कार्यक्रम संपन्न
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयवंतराव पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित साधून शिरोळ मधील गरीब निराधार वृद्ध महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.
मा दिगंबर सकट म्हणाले आपण वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने आपण साजरे करतो पण त्याचा गोरगरीब सामान्य जनतेला फायदा होत नाही नको तो खर्च केला जातो.
याला फाटा देत वृद्ध गरीब महिलांचा शोध घेऊन त्यांना साड्या देण्यात आल्या या महिलांकडून फार समाधान व्यक्त करण्यात आले अनेक वयोवृद्ध महिलांनी मा जयंत पाटील साहेब यांना आशीर्वाद देऊन समाधान व्यक्त केले साड्या वाटप करण्यासाठी माजी सरपंच बी जी माने. कामगार आघाडीच्या राज्य उपाध्यक्ष गजाला मुल्ला. तालुका अध्यक्ष विक्रम सिंह जगदाळे. मुबिन मुल्ला अष्टेकर .
शरद गुरव अवधूत लंबे लक्ष्मी सकट रियाना काळे. भिंगरा लोंढे. सुरेश पांढरे रणजीत सकट व असंख्य महिला उपस्थित होत्या
स्वागत व आभार आनंदराज सकट यांनी मांडली