
पुणे(खडकी)..तीन वर्षांपासून मेट्रोच्या व रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली प्रशासनाने एकेरी वाहतूक करून प्रचंड मोठी वाहतूक कोंडी केली आहे याचा नाहक त्रास आजूबाजूतील लाखो नागरिकांना सहन करावा लागत आहे जवळच्या खडकी बाजारात जाण्यास अडचणी निर्माण होतात म्हणून नाविलाजासत्व लांबच्या पल्यावर जावून खरेदी करावी लागत आहे याचा परिणाम छोट्यामोठ्या व्यापाऱ्यांवर होत आहे धंदा ठप होत चालला आहे असे अनेक समस्यांना नागरिकांना व्यापारांना सामोरे जावे लागत आहे प्रशासन मुग गिळून गप्प बघत बसल आहे म्हणून लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून जन आंदोलन छेडावे लागेल पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला(सर) यांनी काँर्नर सभेला जाहीर पाठिंबा देत आलेल्या व्यापारी जनसमुदायाला मार्गदर्शपर मनोगत व्यक्त केले
या काँर्नर सभेला काँग्रेसचे नगरसेवक दत्ता बहिरट, पोलीस निवृत्त अधिकारी आनील पवार उपस्थित होते मुलभूत समस्यावर मार्ग काढण्यासाठी महाविकास आघाडी व इतर पक्षसंघना एकत्र येवून काँर्नर सभा आयोजित करण्यात आली सभेचे नियोजन भरत ठाकूर, हेमंत यादव, निकीत यादव, नईम शेख, गोपाळ वाघमारे,बाबूभाई शेख,गुरुनाथभाऊ आदींनी केले