*डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग व बी.व्ही.जी इंडिया यांच्यात सामंजस्य करार *
बी.व्ही.जी. इंडिया लिमिटेड व जे.जे. मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालय जयसिंगपूर यांच्यामध्ये प्लेसमेंट, इंटरनेट व ट्रेनिंग इत्यादी बाबी करता सामंजस करार करण्यात आला. या करायला वेळी भारत विकास ग्रुपचे चेअरमन, मॅनेजिंग डायरेक्टर हनुमंतराव गायकवाड, प्लेसमेंट प्रमुख जे जे मगदूम अभियांत्रिकीचे ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर प्रा. पी.पी.माळगे उपस्थित होते.
बी.व्ही.जी. इंडिया लिमिटेड या कंपनीची वार्षिक उलाढाल २००० कोटी वर असून बी.व्ही.जी. उद्योग समूहाच्या विविध क्षेत्रात सध्या ७०,००० पेक्षा जास्त कर्मचारी काम करत आहेत. या सामंजस्य करारामुळे कंपनी मार्फत विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत तसेच रोजगार च्या नवीन नवीन संधी व उद्योजकता विकासासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. या सामंजस्य कराराद्वारे बी.व्ही.जी. ग्रुप प्रायोरिटी प्लेसमेंट पार्टनर म्हणून महाविद्यालयासाठी काम करणाऱ आहे.
बी.व्ही.जी. इंडिया ह्या मोठ्या कंपनी सोबत झालेल्या सामंजस कराराचा फायदाआपल्या विद्यार्थ्यांच्यासाठी निश्चित होईल असे मत महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. एस. एस.आडमुठे व प्राचार्या डॉ. एस. बी.पाटील यांनी व्यक्त केले. अशा मोठ्या कंपनीशी झालेल्या कराराबद्दल डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ.विजय मगदूम व व्हाईस चेअरपर्सन डॉ. सोनाली मगदूम यांनी समाधान व्यक्त केले. व भविष्यातील कामगिरीसाठी प्लेसमेंट ऑफिसरना शुभेच्छा दिल्या.
Posted inकोल्हापूर
डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग व बी.व्ही.जी इंडिया यांच्यात सामंजस्य करार *
