इचलकरंजीची नवी ओळख ‘एमएच 51’

इचलकरंजीची नवी ओळख ‘एमएच 51’

इचलकरंजी –
आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या एमएच 51 या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आणि इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या नुतनीकरणाचे शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात येत आहे. या निमित्ताने वस्त्रनगरीची ‘एमएच 51’ अशी नवीन ओळखही होणार आहे, अशी माहिती माजी जिल्हा परिषद डॉ. राहुल आवाडे यांनी दिली.
इचलकरंजी शहरासह हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील वाहनधारकांना वाहन पासिंगसाठी कोल्हापूर व मोरेवाडी येथे जावे लागत असल्याने त्यांची गरज ओळखून आमदार प्रकाश आवाडे यांनी शासन दरबारी पाठपुरावा करुन तारदाळ येथील केएटीपी संस्थेच्या जागेत संस्थेच्या वतीने नियमानुसार आवश्यक तो ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार करुन दिला. त्याचबरोबर या परिसरातील नवीन वाहनांसाठी इचलकरंजीतच नवीन नोंदणी क्रमांक मिळावा यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयसुध्दा मंजूर करुन आणले आहे. त्याद्वारे नवीन वाहनांना आता एमएच 51 असा नोंदणी क्रमांक मिळणार असून वस्त्रनगरीबरोबरच इचलकरंजीची नवीन ओळख निर्माण होणार आहे.
इचलकरंजी परिसरासह नजीकच्या सीमाभागातील नागरिकांसाठी आधारवड असलेले इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाने आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नातून कात टाकली असून याठिकाणी संपूर्णत: अत्याधुनिक सेवा-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. शिवाय 200 बेडचे असलेले रुग्णालय आता 300 बेडचे झाले आहे. या रुग्णालयात एकूण 6 ऑपरेशन थिएटर असणार असून त्यामध्ये न्यूरो, हार्ट, आर्थो, जनरल असे चार थिएटर पहिल्या मजल्यावर तर तळमजल्यावर अपघात आणि प्रसुतीसाठीचे दोन थिएटर असणार आहेत. तसेच लहान मुलांसह मोठ्यांसाठी सुसज्ज असे अतिदक्षता विभाग सुरु आहेत. या रुग्णालयाच्या संपूर्ण नुतनीकरणासह वैद्यकिय अधिकारी, स्टाफ व कर्मचार्‍यांच्या नवीन निवासस्थान उभारणीसाठी आमदार आवाडे यांच्या प्रयत्नातून कोट्यवधीचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या नुतनीकरण व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या उद्घाटनाने इचलकरंजी शहराची नवीन ओळख निर्माण होणार आहे. याकामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे श्री. आवाडे यांनी सांगितले

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *