महाराष्ट्र क्रांती सेना पक्ष लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात : सुरेशदादा पाटीलचार जागा लढविणार : बुधवारी मुंबईत होणार घोषणा

महाराष्ट्र क्रांती सेना पक्ष लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात : सुरेशदादा पाटीलचार जागा लढविणार : बुधवारी मुंबईत होणार घोषणा

महाराष्ट्र क्रांती सेना पक्ष लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात : सुरेशदादा पाटील
चार जागा लढविणार : बुधवारी मुंबईत होणार घोषणा

इचलकरंजी –
सद्याच्या राजकारणातील अस्थिर परिस्थिती, लोकप्रतिनिधींनी मतदारसंघात केलेली कामे पाहता महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाने आगामी लोकसभा निवडणूकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पक्षाचे संस्थापक सुरेशदादा पाटील यांनी दिली. महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाच्या वतीने रायगड, जळगांव, सिंधुदुर्ग-रत्नागिरी आणि हातकणंगले लोकसभा या चार जागा लढविण्यात येणार आहेत. बुधवारी (13 मार्च) रोजी मुंबईत होणार्‍या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे.
राजकारणात सातत्याने होत असलेली स्थित्यंतरे आणि राजकीय अराजकता यामुळे मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालेले आहे. प्रत्येक मतदारसंघात विद्यमान लोकप्रतिनिधींनी केलेली कामे याची माहिती घेऊन निर्माण झालेली राजकीय परिस्थिती पाहता महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाने लोकसभा निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या महाराष्ट्राचे चित्र अत्यंत विदारक झाल्याचे दिसत आहे. जर महाराष्ट्रात खर्‍या अर्थाने क्रांंती करायची असेल तर नव्या दमाच्या लोकांना संधी दिली गेली पाहिजे. तरच महाराष्ट्रात खर्‍या अर्थाने शैक्षणिक, राजकीय, सामाजिक क्षेत्राचा विकास होईल. हाच विकासाचा मुद्दा घेऊन महाराष्ट्राला विकासाच्या उंचीवर नेण्यासाठी नवीन कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणूकीत संधी दिली जाणार आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग, हातकणंगले, जळगाव आणि रायगड या चारही लोकसभा मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र क्रांती सेनेला अत्यंत चांगला प्रतिसाद असून महाराष्ट्र क्रांती सेनेची ताकत ही निर्णायक ठरणारी आहे. या चारही मतदारसंघात पाणी, नोकरी, शिक्षण आणि आरोग्य हे महत्वाचे प्रश्‍न सातत्याने भेडसावत आहे. ते प्रश्‍न सुटणे गरजेचे असताना मागील अनेक वर्षापासून ते प्रलंबितच आहेत. हे प्रश्‍न सोडवून मतदारसंघांचा विकासाच्या माध्यमातून कायापालट करण्यासाठी महाराष्ट्र क्रांती सेना पक्ष निवडणूक रिंगणात उतरत असल्याचे सुरेशदादा पाटील यांनी सांगितले.
या संदर्भात बुधवार 13 मार्च रोजी मुंबई येथे महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाची राज्य कार्यकारणीची बैठक होत आहे. या बैठकीत याची अधिकृत घोषणा आणि उमेदवारांची नांवे जाहीर केली जाणार आहेत, अशी माहिती सुरेशदादा पाटील यांनी दिली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *