डॉ. शरद गायकवाड यांना महाराष्ट्र शासनाचा अण्णाभाऊ साठे पुरस्कार जाहीर

डॉ. शरद गायकवाड यांना महाराष्ट्र शासनाचा अण्णाभाऊ साठे पुरस्कार जाहीर

डॉ. शरद गायकवाड यांना महाराष्ट्र शासनाचा अण्णाभाऊ साठे पुरस्कार जाहीर

कोल्हापूर,दि.९ (प्रतिनिधी) महावीर महाविद्यालयाच्या मराठी विभागातील डॉ. शरद गायकवाड हे साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. डॉ. शरद गायकवाड यांनी मातंग समाजावर पीएच. डी. केलेली असून अण्णाभाऊ साठे यांचे कनिष्ठ बंधू ‘शंकर भाऊ साठे यांच्या कादंबऱ्यांचा अभ्यास’
या विषयावर १९९७ मध्ये शिवाजी विद्यापीठात एम.फील. केलेली आहे.
‘मातंग समाज साहित्य आणि संस्कृती’, ‘मातंगांची शौर्यगाथा’, ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि अण्णाभाऊ साठे, ‘बहुजनवादी साहित्य’, ‘क्रांतीचं कुळ आणि बंडाचं मूळ’, ‘अॅट्रॉसिटी अॅक्ट’ यासारख्या १३ वैचारिक ग्रंथांचे लेखन डॉ. शरद गायकवाड यांनी केलेले आहे.
गेली तीस वर्षे डॉ. शरद गायकवाड हे मराठवाडा, विदर्भ, खानदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गोवा येथे जाऊन फुले- शाहू-आंबेडकर, लहुजी, अण्णाभाऊ साठे या महापुरुषांच्या विचारांचा प्रसार-प्रचार करीत आहेत.
रशिया, थायलंड, मलेशिया देशात जाऊन आंतरराष्ट्रीय चर्चासत्रां मधून परिवर्तनवादी, प्रबोधनवादी विचारांचे शोधनिबंध सादर करून आंतरराष्ट्रीय पातळीवर व्याख्याने देत आहेत. धर्मनिरपेक्षता, समाजवाद, संविधान साक्षरतेबरोबरच अंधःश्रद्धा निर्मूलन, ‘जाती तोडा-समाज जोडा’ अभियान ते राबवित आहेत.
डॉ. शरद गायकवाड यांच्या सामाजिक, साहित्यिक कार्याबद्दल महाराष्ट्रात अनेकविध संघटनांकडून त्यांना आजपर्यंत सत्तावीस पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे.
‘मॉरिशस’च्या आंतरराष्ट्रीय कार्यगौरव पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते.
फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक, ज्येष्ठ साहित्यिक, राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते तसेच फुले,शाहू,आंबेडकर,अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची पताका राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मानाने फडकविणारे विचारवंत, समीक्षक डॉ. शरद गायकवाड (कोल्हापूर) यांना महाराष्ट्र शासनाचा अण्णाभाऊ साठे पुरस्कार जाहीर झाला असून त्यानिमित्त सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार दिनांक 12 मार्च 2024 रोजी मुंबई येथे सकाळी ठीक अकरा वाजता मुख्यमंत्री व दोन्ही मुख्यमंत्री यांच्या हस्ते संपन्न होणार आहे होणार आहे

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *