डॉ तेजाली रोहीदास एमडी पंचकर्म मध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट कडुन सत्कार
बेडकिहाळ येथील चंद्रकांत रोहीदास यांची कन्या डॉ तेजाली रोहीदास यांनी राजीव गांधी युनिव्हर्सिटी एमडी पंचकर्म मध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. डॉ. तेजाली रोहिदास यांनी बीएएमएसचे शिक्षण केएलइ येथे कंणकंणवाडी कॉलेज मध्ये 2019 ला पूर्ण करून त्यांना 79.80 %टक्के मार्कसनी उत्तीर्ण झाल्याने त्यांना केएलई युनिव्हर्सिटीने सुवर्णपदक देऊन सन्मान केला.
त्यानी 2019 ला बीए.एम.एस.चे शिक्षण घेऊन 2021 ला एमडी पंचकर्मासाठी बेंगलोर येथील गव्हर्मेंटच्या आयुवेर्दिक कॉलेजला प्रवेश घेऊन तीन वर्षाचा कोर्स यशस्वी रित्या पार पाडला .त्या नंतर 2024 ला 74.50 टक्के मार्क्स घेऊन पुढ़े राजीव गांधी युनिव्हर्सिटीत प्रवेश घेऊन एमडी पंचकर्म मध्ये दुसरे स्थान पटकावून कोर्स पूर्ण केला. डॉ तेजाली रोहीदास या एमडी डॉक्टर झाल्यामुळे
शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विक्रम शिंगाडे यांनी डॉ. तेजाली रोहीदास यांचा सत्कार करण्यात केला. व त्यांना पुढ़ील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यावेळी डाॅ. विक्रम शिंगाडे. व डॉ तेजाली रोहीदास यांचे आई-वडील व त्यांचे सहकुटुंब उपस्थित होते.