कोल्हापुरात १९ फेब्रुवारीला ‘पँथर आर्मी’तर्फे भव्य शिवजयंती महोत्सव
व्याख्यान, पुरस्कार वितरण आणि क्रांतिकारी गीतांचा रंगणार सोहळा
कोल्हापूर:
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंती निमित्त पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेतर्फे भव्य ‘शिवमोहत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा गुरुवार, दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे पार पडणार आहे. मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून महोत्सवाचे उद्घाटन होईल, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष संतोष आठवले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये:
या महोत्सवात प्रबोधन आणि संस्कृतीचा संगम पाहायला मिळणार आहे. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण खालीलप्रमाणे असतील:
प्रबोधनात्मक व्याख्यान: पँथर आर्मी चे राष्ट्रीय नेते डॉ. राजेंद्रसिंह वालिया यांचे विशेष व्याख्यान होणार आहे.
शिव प्रेरणा पुरस्कार: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘शिव प्रेरणा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे.
सांस्कृतिक कार्यक्रम: सुरेश सातारकर प्रस्तुत ‘क्रांतिकारी गीतांचा’ कार्यक्रम होईल. यामध्ये कराओकेवर आधारित शाहिरी पोवाडे आणि स्फूर्तीगीतांचे सादरीकरण करण्यात येईल.
सहभागाची संधी: हौशी गायक आणि इच्छुकांना कराओकेवर गीते गाण्याची संधी दिली जाणार असून, सहभागींना सन्मानपत्र व महापुरुषांची पुस्तके देऊन सन्मानित करण्यात येईल.
मान्यवरांची उपस्थिती:
या सोहळ्यास ज्येष्ठ पत्रकार व पँथर आर्मी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी उमेश जामसंडेकर, प्रदेशाध्यक्ष प्रा. अरुणजी मेढे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा ज्योती झरेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच कोल्हपुर जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र रुईकर, जिल्हा उपाध्यक्ष संजय कांबळे, जिल्हा महासचिव नितेश कुमारदिक्षांत, सांस्कृतीकआघाडी जिल्हा अध्यक्ष बबन तांदळे, महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा सौ. छाया सातारकर आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
संपर्क व नोंदणी:
कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी किंवा नाव नोंदणीसाठी अमोल कुरणे (अध्यक्ष, परिवर्तन संस्था) यांच्याशी ८४२१५९७७७८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Posted inपँथर आर्मी न्युज
कोल्हापुरात १९ फेब्रुवारीला ‘पँथर आर्मी’तर्फे भव्य शिवजयंती महोत्सवव्याख्यान, पुरस्कार वितरण आणि क्रांतिकारी गीतांचा रंगणार सोहळा
