
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवार मा. सुधाकर तावदारे घोषीत
गरीब सेना पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडवून दिली
कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवार जाहीर केले
सतीश भंडारे गरीब सेना संस्थापक अध्यक्ष यांनी केली घोषणा
सतीश भंडारे यांच्या 23 वर्षात राजकीय, सामाजिक काम, आंबेडकर चळवळीतील आक्रमक नेता तसेच गरीब व श्रीमंत या दोनच जाती आहेत असे सांगून गरीब सेना काढून गरीब लोकांना मोर्चा, आंदोलन, करून न्याय दिला आहे
त्यांना महाराष्ट्र राज्यातील लोक ओळखतात म्हणून त्यांनी आपल्या आश्वासक चेहरा, लोकप्रिय व्यक्तीमत्वाचा उपयोग करून आज कुरुंदवाड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाच्या पायी उमेदवार जाहीर केले आहे
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून लिंगायत समाजाचे प्रतिनिधी म्हणून मा. सुधाकर तावदारे रा. कुरुंदवाड
व कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून मुस्लिम समाजातील प्रतिनिधित्व मौलाना इरफान चांद साब रा. आजरा जि कोल्हापूर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
लिंगायत, मुसलमान, व दलित या व गरीब मतदार अशी गणित जुळवून गरीब सेना खळबळ उडवून दिली आहे
महाविकास आघाडी व महायुतीच्या वादात गरीब सेना आपले उमेदवार निवडून येणार असल्याचे भंडारे यांनी खात्री ने सांगितले
तसेच सातारा व माढा लोकसभा मतदारसंघातून आठ दिवसात उमेदवार जाहीर करण्यात येईल असे म्हटले आहे