महाराष्ट्रामध्ये 72 हजार आशा महिला व चार हजार गटप्रवर्तक महिला आहेत. गटप्रवर्तक महिला या अशा महिलांच्या सुपरवायझर आहेत संपाची सुरुवात करीत असताना आशा व गटप्रवर्तकांच्या दोन स्वतंत्र संप नोटिसा महाराष्ट्र शासनाला देण्यात आलेल्या होत्या. तारीख एक नोव्हेंबर 2023 रोजी श्री तानाजी सावंत यांनी मानधन वाढीचा निर्णय घोषित करताना आशा महिलांना दरमहा सात हजार रुपये मानधन वाढ आणि गटप्रवर्तक महिलांना दरमहा सहा हजार दोनशे रुपये मानधन वाढ अशी घोषणा केलेली होती. परंतु प्रत्यक्षात मात्र तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेत असताना स्वतःच दिलेल्या निर्णयाचा पाठपुरावा करता आला नाही हे सुपरवायझर्स महिलांचे दुर्दैव आहे.
अशांना मानधन वाढ होण्यापूर्वी फिक्स मानधन सात हजार रुपये मिळत होते आणि कामावर आधारित मोबदला स्वतंत्र मिळत होता.तो सरासरी 3000 च्या दरम्यान मिळत होता. सध्या पाच हजार रुपये वाढ झाल्यामुळे फिक्स मानधन अशांना दरमहा 12000 रुपये मिळणार आहे. आणि त्यानंतर किमान 3000 ते चार हजार रुपये कामावर आधारित मोबदला मिळणार आहे. असे एकूण अशाना दरमहा पंधरा हजारापेक्षा जास्त मानधन मिळेल.
सध्या गटप्रवर्तक महिलांना 6250 रुपये मानधन व दरमहा 8475 रुपये प्रवास भत्ता मिळत होता यामध्ये काहीच वाढ झालेली नाही.
म्हणून आम्ही युनियनच्या वतीने मागणी करीत आहोत की, ताबडतोब गटप्रवर्तक महिलांना दरमहा सहा हजार दोनशे रुपये मानधन वाढ देण्याबद्दल चा महाराष्ट्र शासनाने निर्णय करावा.
तारीख 13 मार्च रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये, असाही निर्णय घेण्यात आलेला आहे की महाराष्ट्रामध्ये जे 27 हजार कंत्राटी कर्मचारी आहेत त्यातील टप्प्याटप्पाने प्रत्येक वर्षी 33 टक्के कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम कर्मचारी म्हणून नेमण्यात येईल हा निर्णय गटप्रवर्तक महिलांना सुद्धा लागू आहे.
म्हणूनच महाराष्ट्रातील ज्या गटप्रवर्तक महिलांनी दहा वर्षापेक्षा जास्त कंत्राटी पद्धतीने आरोग्य खात्यामध्ये सेवा केलेली आहे त्यांच्याही समायोजन करून त्यांना आरोग्य सेवेमध्ये कायम कर्मचारी म्हणून त्यांची नेमणूक करावी अशी मागणी करणारे पत्रक महाराष्ट्र राज्य अशा गटप्रवर्तक आरोग्य कर्मचारी संघटनेच्या जनसेक्रेटरी कमेंट संबंध पुजारी यांनी पत्रक प्रसिद्धी दिलेली आहे.
Posted inसांगली
आशा महिलांना दरमहा पाच हजार रुपये मानधन वाढ गटप्रवर्तक महिलांना मात्र काहीही मानधन वाढ न केल्याने त्यांच्यामध्ये संतापजनक निराशा.
