——————+++++———–
सांगली जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना त्वरित घरे मिळण्यासाठी 24 जून रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चा.
मागील एक वर्षापासून सांगली जिल्ह्यातील किमान पंधराशे नोंदीत बांधकाम कामगारांनी बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेअंतर्गत घरासाठी मिळणारे अनुदान दोन लाख रुपये मिळावेत असे अर्ज केलेले आहेत. परंतु ते सर्व अर्ज अद्याप प्रलंबित आहेत.
विशेष म्हणजे घरासाठी अनुदान देणे योजना ही ऑनलाईन पद्धत नसून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया असूनही सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत तपासलेले नाहीत. यासाठीच हे अर्ज त्वरित तपासून मंजूर करावेत यासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर ठीक सकाळी 11 वाजता 24 जून रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय मेळाव्यामध्ये घेण्यात आला आहे.
सध्या महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांचे ऑनलाईन काम केले जाते परंतु कल्याणकारी मंडळाने अचानकपणे फक्त दररोज शंभर अर्ज तपासली जातील असे घोषित केलेले आहे प्रत्यक्षात सध्या महाराष्ट्रामध्ये 15 लाख एकूण बांधकाम कामगारांची नोंदणी आहे.आणि 15 लाख प्रलंबित अर्ज आहेत.
तरीही आचारसंहिता उठल्यानंतर सुद्धा बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मार्फत बांधकाम कामगारांचे कामकाज जवळजवळ बंद ठेवून बांधकाम कामगारांच्यावर प्रचंड अन्याय केला जात आहे. त्याच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय ही मेळाव्यामध्ये घेण्यात आला.
महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने 13 जून रोजी मुंबईमध्ये कल्याणकारी मंडळाचे सचिव कामगार आयुक्त व कामगार विभागाचे प्रधान सचिव यांना भेटून निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
या मेळाव्यामध्ये सांगलीचे नागरिक संघटनेचे कार्यवाह नेते श्री वि द बर्वे यांनीही कामगारांना बांधकाम कामगारांची घरे मिळण्याबाबत मार्गदर्शन केले.
मेळाव्यामध्ये प्रा. शरयू बडवे व विशाल अशोक बडवे यांनीही कामगारांच्या समस्या बाबत भूमिका मांडली.
या मेळाव्यामध्ये सलीम इनामदार, पांडुरंग मंडले, शेखर पडळकर ,अश्विनी केंगार, मोहन जावीर, सीमा वाघमोडे, रोहिणी कांबळे ,अर्चना बेळंके, विजय पाटील ,राजेंद्र मंगसुळे, पांडुरंग वसगडेकर ,विनोद पाणबुडे, मनीषा पवार, रोहिणी खोत, वैभव बडवे ,सनम मुल्ला, इत्यादिनी महत्वपूर्ण भागीदारी केली
Posted inसांगली
सांगली जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना त्वरित घरे मिळण्यासाठी 24 जून रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चा.
