चोकाक येथील विशाल हॉटेल येथे भाजप जिल्हा विस्तारीत कार्यकारिणी बैठक संपन्न
चोकाक :- हातकणंगले तालुक्यातील चोकाक येथील विशाल हॉटेल येथे भाजप जिल्हा विस्तारीत कार्यकारिणी बैठक संपन्न झाली यावेळी भाजप च्या चीत्राताई वाघ महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष महिला तसेच सौ शौमिका महाडिक व सुरेश हाळवणकर यांच्या उपस्थितीत आज पार पडली यावेळी सुरुवातीला सौ शौमिका महाडिक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भाजपाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले विधानसभेच्या पूर्व संध्येला कार्यकर्त्यांनी जोमाने तयारीला लागावे तसेच सरकारने लागू केलेल्या लाडकी बहिण योजना यांची परिपूर्ण माहिती सांगितली तसेच सुरेश हाळवणकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कार्यकर्त्यांना लोकसभेची आठवण करून देत राजू शेट्टी यांच्यावर टीका करत सुरुवात केली तसेच भाजप पक्षाची सुरुवात कशी झाली हे यावेळी त्यांनी स्पष्ट केले श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी हिंदू एकता पार्टी ची स्थापना केली व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची घटना लिहिली त्यावेळी पं जवाहरलाल नेहरू यांनी महात्मा गांधी यांच्या सूचनेनुसार या दोन नेत्यांना घेऊन भाजप पक्षाची सुरुवात केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तसेच भाजपाच्या महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष सौ चित्राताई वाघ यांनी आपल्या भाषणात काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यावर जोरदार टीका करत सुरुवात केली असल्याचे दिसून आले आपापली जबाबदारी ओळखून तयारीला लागा मी का करायचे जो कोन अध्यक्ष आहे तो बघेल असे न सांगता प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्नशिल राहावे असे आवाहन यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित सौ चीत्राताई वाघ महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष भाजप, सौ शौमिका महाडिक प्रदेश उपाध्यक्षा महिला , राजवर्धन नाईक निंबाळकर जिल्हाध्यक्ष, भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, अरूनराव इंगवले, ज्येष्ठ नेते , अशोकराव माने हातकणंगले, हिंदुराव शेळके मा जिल्हाध्यक्ष, अमर पाटील हातकणंगले तालुका अध्यक्ष, अमृत मामा भोसले इचलकरंजी, मुकुंद गावडे शिरोळ, अमरसिंह भोसले पन्हाळा, मिलिंद भिडे जयसिंगपूर, पुष्पा ताई पाटील महिला आघाडी, शहाजी भोसले जिल्हा सरचिटणीस, विठ्ठल पाटील जिल्हा सरचिटणीस,रामचंद्र डांगे, विजयराव भोजे, तय्यब कुरेशी अल्पसंख्यांक, अशोक स्वामी, संतोष वाठारकर अनु सु जाती, स्वाती पाटील पन्हाळा, डॉ निता माने जयसिंगपूर, डॉ रवींद्र माने जिल्हा युवा मोर्चा, तानाजी पोवार इचलकरंजी, मिक्षीलाल जाजू, अशोक माळी जिल्हाध्यक्ष ओ बी सी, अजय चौगुले, यांच्यासह अनेक मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.