आज १५ ऑगस्ट भारताचा ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. यानिमित्त महाराष्ट्रासह साऱ्या देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण देश आज तिरंगामय झाला आहे. भारताचा तिरंगा ध्वज आज अभिमानाने घरा घरावर डौलाने फडकत आहे. देशवासीयांच्या मनात आज देशाप्रती अभिमानाची भावना असते. स्वातंत्र्यदिनाचा सोहळा हा केवळ शासन दरबारीच नाही तर भारताच्या प्रत्येक नागरिकांकडून साजरा होत आहे राज्यातील अनेक शाळांमध्ये पंधरा आँगस्टच्या निमित्ताने विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अंधेरी येथील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज मध्ये शाळेचे प्राचार्य गोविंद राजनश्रीनिवासन यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला. शाळेतील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपासून काँलेज मधील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र दिनाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. देशभक्ती गीत, एकांकिका, नृत्य, समयोचित भाषणे विद्यार्थ्यांनी सादर केली. स्काऊट अधिकारी जितेंद्र महाजन यांनी विद्यार्थ्यांकडून विशेष संचलन केले.
कला शिक्षक अभय ठाकरे व अनुभव पवार यांनी पंधरा आँगस्टच्या निमित्ताने शाळा परिसरात विशेष सजावट केली होती विद्यार्थ्यांनी देशप्रेम जतन करून खरा नागरीक बनावे असा संदेश प्राचार्य गोविंद राजन श्रीनिवासन यांनी दिला.
Posted inमुंबई
पंधरा आँगस्ट मोठ्या उत्साहात देशभर साजरा
