पॅथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचा राहुल आवाडे यांना जाहीर पाठिंबा

इचलकरंजी –
महाराष्ट्राचे मँचेस्टर अशी ओळख असलेले इचलकरंजी शहर वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. आणि वस्त्रोद्योग व कामगारांचा विकासात्मक आश्वासक चेहरा म्हणजे राहूल आवाडे यांची ओळख आहे. गत चार दशकांपेक्षा अधिक काळापासून इचलकरंजी शहराचा सर्वांगिण विकास आवाडे कुटुंबियांनी केला आहे. आवाडे कुटुंबियांच्या विकसनशील धोरणामुळेच शहरातील अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, भटक्या जाती, विमुक्त जमाती व बहुजन समाजाचा उत्कर्ष होणार आहे. अन् त्यासाठीच पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना यांच्या वतीने महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांना पाठींबा देण्यात येत आहे. त्यांना प्रंचड अन् विक्रमी मताधिक्याने विजयी करण्यासाठी आम्ही जीवाचे रान करु, अशी ग्वाही राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले यांनी दिली.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले यांनी पाठींब्याचे पत्र आमदार प्रकाश अवाडे व राहुल आवाडे यांना दिले. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख समीर विजापुरे, हातकणंगले तालुका अध्यक्ष मुकेश घाटगे कबनूर शहरप्रमुख शितल ढवळे आदी उपस्थित होते.