संत रोहिदासांचे विचार आजही अनुकरणीय असून,भारतीय इतिहास आणि साहित्यात त्यांचे स्थान अनन्य साधारण आहे.
चौदाव्या शतकातील संत रोहिदासांनी मांडलेले समतेचे विचार आजही मार्गदर्शक व प्रेरणादायी आहेत असे मनोगत आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. योगेश साळे यांनी मांडले.
संत रविदास महाराजांचा जन्म १४ व्या शतकातला असून, आज त्यांची ६४८ वी जयंती आहे.
राष्ट्रसंत रोहिदास महाराज यांची ६४८वी जयंती सर्वधर्मीय जयंती समितीतर्फे साजरी करण्यात आली.
कोल्हापुरातील जवाहर नगर येथील राष्ट्रसंत रोहिदास महाराज यांच्या पुतळ्यास आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. योगेश साळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अतुल शेटे संपादित संत रोहिदास महाराज यांच्या चरित्राचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी देवी इंदुमती बोर्डिंग चे संचालक दुर्वासबापू कदम, माजी उपमहापौर भुपाल शेटे, परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष अमोल कुरणे, प्रसाद शेटे, पॅंथर आर्मीचे अध्यक्ष संतोष आठवले,बार्टीच्या आशा रावण, श्रीराम माने, सतीश रास्ते, संतोष बिसुरे , अंकुश बामणे, रवींद्र बामणीकर, पंडित बामणे, रवी सातपुते, रवी पवार,अरुण कुराडे,विवेक सातपुते, बाबू गायकवाड,मोहन पवार, शिवाजी गिरी गोसावी
मुकेश घाटगे, सचिन माने, समीर विजापुरे आदी उपस्थित होते