मद्य वाहनासह सहा लाखाचा मुद्देमाल जप्त ; एक्साईज कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाची कारवाई

मद्य वाहनासह सहा लाखाचा मुद्देमाल जप्त ; एक्साईज कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाची कारवाई

मद्य वाहनासह सहा लाखाचा मुद्देमाल जप्त

एक्साईज कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाची कारवाई

अमोल कुरणे

कोल्हापूर,दि.१४ (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क एक्साईज कोल्हापूर जिल्हा अधीक्षक श्रीमती स्नेहलता नरवणे, उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भरारी पथकाने संभाजीनगर पेट्रोल पंपा समोरिल चौकामधून पांढ-या रंगाची फोक्सवॅगन पोलो वाहन थांबवून तपासणी केली असता पाठीमागील सीटवर व डिकीमध्ये ठेवलेली गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याने भरलेली विविध ब्रँडचे बॉक्स मिळुन आले.
या प्रकरणी गणेश चन्नाप्पा कलगुटगी व.व. २४ रा. रेसकोर्स नाका, संभाजीनगर, बी
१८४९ कोल्हापूर यास अटक करण्यात आली असून पकडण्यात आलेल्या पांढ-या रंगाची फोक्सवॅगन पोलो वाहन क्र. एम.एच. ०५ बी. एल. o७ ८५ मध्ये विविध ब्रँडचे मद्य मिळून आले. वाहनासह एकूण मुद्देमालाची किंमत ६ लाख १९, ९४० असून मद्याची किंमत १ लाख १९, ९४० आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून इतर आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे कोल्हापूर भरारी पथक क्र.१ चे निरीक्षक सदानंद मस्करे यांनी सांगितले.
या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक गिरीशकुमार करचे, अभयकुमार साबळे, सहा. दु. निरीक्षक कांचन सरगर, जवान विलास पोवार, धीरज पांढरे, विशाल भोई, सचिन लोंढे, प्रसाद माळी व साजीद मुल्ला यांनी सहभाग घेतला. आरोपीला कोर्टात हजर केले असता तीन दिवसाची एक्साईज कोठडी मिळाली

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *