राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मोहिम 2.0 अंतर्गत0 ते 18 वर्ष वयातील मुला-मुलींची सर्वांगीण विनामूल्य आरोग्य तपासणी होणारनिरोगी बालपण हे सुरक्षित भविष्य निर्माण करेल

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मोहिम 2.0 अंतर्गत0 ते 18 वर्ष वयातील मुला-मुलींची सर्वांगीण विनामूल्य आरोग्य तपासणी होणारनिरोगी बालपण हे सुरक्षित भविष्य निर्माण करेल
  • जिल्हा शल्याचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मोहिम 2.0 अंतर्गत
0 ते 18 वर्ष वयातील मुला-मुलींची सर्वांगीण विनामूल्य आरोग्य तपासणी होणार
निरोगी बालपण हे सुरक्षित भविष्य निर्माण करेल
– जिल्हा शल्याचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख

कोल्हापूर, दि. १ (प्रतिनिधी) : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मोहिमेची जिल्ह्यात सुरुवात झाली असून 0 ते 18 वर्ष वयातील मुला-मुलींची सर्वांगीण विनामूल्य आरोग्य तपासणी होणार आहे. निरोगी बालपण हे सुरक्षित भविष्य निर्माण करेल याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्याचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांनी केले.
बालकल्याण संकुल येथे जिल्हास्तरीय राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मोहिमेचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने झाले. या अभियानामध्ये मुलांमधील दोष, आजारपण लवकर शोधणे व वेळीच उपचार करुन भविष्यात आरोग्य विषयक उद्भवणारे दोष कमी करणे आणि भविष्यकाळात देशाची आर्थिक व सामाजिक उन्नती साधने हा उद्देश असल्याचे सांगितले.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अंतर्गत राज्यातील 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांची होणार सर्वांगीण तपासणी या उपक्रमांतर्गत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय मोहिमेचे उद्घाटन कार्यक्रमाचे पुणे येथून थेट प्रक्षेपण दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थितांना दाखविण्यात आले.
जिल्हा परिषद व अनु संरक्षण संघटना बाल कल्याण संकुलातील मानदकार्यवाहक श्रीमती पद्मजा तिवले यांनी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत लहान मुला-मुलींना, सेवकांना देण्यात येत असलेल्या आरोग्य सुविधेबद्दल यावेळी आभार मानले.
यावेळी राष्ट्रीय बाल स्वास्थ समन्वयक प्रज्ञा संकपाळ, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिल देशमुख, सतिश केळूसकर, जिल्हा परिषद व अनु संरक्षण संघटना बाल कल्याण संकुलातील मानदकार्यवाहक श्रीमती पद्मजा तिवले, आरोग्य अधिकारी-कर्मचारी तसेच बाल संकुलातील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षाराणी जाधव यांनी केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *