रत्नागिरी जिल्हा परिषदेवर आशा महिलांचे जोरदार आंदोलन.
महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने सहा मार्च रोजी सकाळी 11 वाजता रत्नागिरी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर आठल्ये यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनाबाबत चर्चा करत असताना डॉक्टर आटले यांनी शिष्ट मंडळाला सांगितले की मागील तीन महिन्याचा आशा गटप्रवर्तक महिलांचे थकीत मानधन लवकर गटप्रवर्तकांना प्रयत्न सुरू आहेत.
ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सीईओचे नेमलेले नाहीत त्या ठिकाणी ते नेमण्याची आमची मागणी सुरू आहे.
ऑनलाइन कामासाठी ज्या आशांचे ट्रेनिंग झालेले नसेल त्यांना ट्रेनिंग देण्यात येईल.
शिष्टमंडळामध्ये कॉ शंकर पुजारी, कॉ सुमन पुजारी, पल्लवी पारकर ,संजीवनी तिवरेकर, संचिता चव्हाण,तनुजा कांबळे व वृंदा विखारे इत्यादी उपस्थित होत्या.
निवेदन दिल्यानंतर झालेल्या जिल्हा परिषदेसमोरील सभेमध्ये बोलताना पिंपरी चिंचवड मधील बांधकाम कामगारांचे नेते श्री दीपक म्हात्रे यांनी आशा महिलांनी सुद्धा पुढाकार घेऊन बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यास मदत करावी असे आवाहन करून याबाबत काही अडचण आल्यास मदत सहकार्य केले जाईल असे त्यांनी सांगितले.
यानंतर बोलताना कॉ शंकर पुजारी यांनी सांगितले की स्थानिक मागण्यांच्या शिवाय गटप्रवर्तक आशा महिलांना 26 हजार रुपये दरमहा मानधन व गटप्रवर्तकांना 30 हजार रुपये दरमहा मानधन मिळाले पाहिजे.
आशा व गटप्रवर्तक महिलांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळण्यासाठी यापुढेही आंदोलन करावे लागणार आहे. त्याचबरोबर आशा व गटप्रवर्तक महिलांना प्रो फंड, पेन्शन ,विमा व ग्रॅज्युटी इत्यादी कायदे लागू झाली पाहिजेत यासाठी ही आंदोलनाची आवश्यकता सांगितली.
Posted inBlog
रत्नागिरी जिल्हा परिषदेवर आशा महिलांचे जोरदार आंदोलन ; महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर आठल्ये यांना दिले निवेदन
