वसुंधरेचे रक्षण : समाज आणि सजग नागरिकत्वाची एकत्रित जबाबदारी- सौ.वर्षा सूर्यकांत मस्के

वसुंधरेचे रक्षण : समाज आणि सजग नागरिकत्वाची एकत्रित जबाबदारी- सौ.वर्षा सूर्यकांत मस्के

वसुंधरेचे रक्षण : समाज आणि सजग नागरिकत्वाची एकत्रित जबाबदारी- सौ.वर्षा सूर्यकांत मस्के

दरवर्षी २२ एप्रिल रोजी साजरा होणारा “जागतिक वसुंधरा दिन” हा पृथ्वीवरील जीवनाच्या रक्षणासाठी जनजागृती निर्माण करणारा महत्त्वपूर्ण दिवस आहे. सध्या आपण हवामान बदल, प्रदूषण, संसाधनांचा अतिवापर व जैवविविधतेचा ऱ्हास यांसारख्या गंभीर पर्यावरणीय संकटांना सामोरे जात आहोत. अशा पार्श्वभूमीवर २०२५ सालचा वसुंधरा दिन अधिकच महत्त्वाचा ठरतो आहे.
या वर्षी, २०२५ जागतिक वसुंधरा दिनाची थीम ” आपली शक्ती, आपला ग्रह ” ही आहे.*
ही थीम सर्व नागरिक, संघटना आणि सरकार यांनी अक्षय अशा नवीकरणीय ऊर्जा स्रोतांकडे वळावे आणि शाश्वत भविष्य घडवण्यासाठी आपल्या जबाबदारीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आवश्यक आहे.
आय पी सी सी च्या २०२३ च्या अहवालानुसार, पृथ्वीचे सरासरी तापमान पूर्व औद्योगिक काळापेक्षा १.१ अंश सेल्सियसने वाढले आहे. त्यामुळे उष्णतेची लाट, पूर, दुष्काळ, अन्नसुरक्षेचा प्रश्न आणि जैवविविधतेचा ऱ्हास या समस्या अधिक तीव्र होत आहेत. भारतात देखील अनियमित पावसाळा, पाणी टंचाई, वाढते तापमान यामुळे शेतीवर आणि जीवनमानावर प्रतिकूल परिणाम होत आहे. या सर्व गोष्टीची प्रमुख कारणे विचारात घेतली तर यामध्ये नैसर्गिक संसाधनांचा अति व असंतुलित वापर, प्लास्टिक व औद्योगिक कचऱ्याचे वाढते प्रमाण, वाहतूक व उर्जाक्षेत्रातून होणारे कार्बनचे उत्सर्जन, वनतोड व जैवविविधतेचा ऱ्हास आणि महत्वाचे म्हणजे समाजात पर्यावरणाविषयी असणारी अपुरी जाणीव जागृती त्यामुळेच पर्यावरण संवर्धनाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी सामान्य माणसाचा सक्रिय सहभाग असणे अत्यावश्यक आहे. प्रत्येक नागरिक हा पर्यावरणाचा लाभार्थी आहे त्यामुळे त्याचे रक्षक करणे त्याची जबाबदारी देखील आहे. यासाठी काही पर्यावरण पूरक उपाय अवलंबणे गरजेचे आहे. यामध्ये प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि पुनर्वापरावर भर देणे. प्रत्येकाने जमेल तसे वृक्षारोपण करणे व स्थानिक जैवविविधतेचे संरक्षण करणे. अक्षय ऊर्जा स्त्रोत जसे सौरउर्जा व पर्यायी उर्जेचा वापर करणे. सार्वजनिक वाहतूक व सायकलचा अवलंब करणे. पर्यावरणाविषयी संवेदनशीलता वाढवणे व इतरांना जागरूक करणे.
पर्यावरण रक्षण ही केवळ एक व्यक्तीची जबाबदारी नाही. ही सामूहिक जबाबदारी असून यासाठी खालील उपाय योजना प्रभावी ठरू शकतात

  1. शाळा, महाविद्यालये व ग्रामपंचायत स्तरावर कार्यशाळा, स्पर्धा व चर्चासत्रांचे आयोजन करणे.
  2. स्थानिक स्वराज्य संस्थांनी वृक्षारोपण, जलसंवर्धन, कचरा व्यवस्थापन या योजना लोकसहभागाने राबवणे.
  3. रेन वॉटर हार्वेस्टिंग, ओला-सुका कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक मुक्त मोहिमा.
  4. युवक मंडळे, NSS, NCC व स्वयंसेवी संस्था यांची सक्रीय भूमिका.
  5. मीडियाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक यशोगाथा व सकारात्मक संदेश प्रसारित करणे.
  6. प्रत्येकाने हरित जीवनशैली स्वीकारणे – वाहनाचा कमी वापर, उर्जा व पाण्याचा जपून वापर, स्थानिक अन्नाला प्राधान्य देणे.
    वसुंधरा दिन म्हणजे फक्त एक दिवस नव्हे तर पृथ्वीच्या रक्षणासाठीची राबवली जाणारी 365 दिवसांची जागरूकता चळवळ आहे. विज्ञान दिशा दाखवते, पण समाज कृती करत असेल तरच शाश्वत भविष्य शक्य आहे. शासन, शास्त्रज्ञ, शिक्षक, विद्यार्थी, महिला मंडळे आणि सामान्य नागरिक यांनी मिळून वसुंधरेच्या रक्षणासाठी सजग पावले उचलली पाहिजेत.
    “पृथ्वी ही आपली आई आहे – तिचे संरक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.”

सौ. वर्षा सूर्यकांत मस्के
उपक्रमशील शिक्षिका,
ताराराणी विद्यापीठाचे उषाराजे हायस्कूल, कोल्हापूर.
मो. W 8275377891

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *