प्रबोधिनीत बुधवारी शेक्सपियरवर व्याख्यानाचे आयोजन

प्रबोधिनीत बुधवारी शेक्सपियरवर व्याख्यानाचे आयोजन

प्रबोधिनीत बुधवारी शेक्सपियरवर व्याख्यानाचे आयोजन

इचलकरंजी ता. २१ जागतिक ग्रंथदिन आणि थोर नाटककार विल्यम शेक्सपियर यांच्या स्मृतीनिमित्त समाजवादी प्रबोधिनीच्या प्रबोधन वाचनालयाच्या वतीने ‘जीवनद्रष्टा नाटककार शेक्सपियर ‘ या विषयावर
ज्येष्ठ रंगकर्मी व इंग्रजी साहित्याचे अभ्यासक प्रा. मिलिंद दांडेकर यांचे जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे.जगभर सर्वत्र शेक्सपियर चे साहित्य वाचले जाते त्याचे कारण त्याला स्थल कालाची मर्यादा नाही. त्याने संपूर्ण मानव जातीच्या भावभावना आपल्या पात्रांच्या संवादातून ,घटना – घडामोडीतून मांडल्या आहेत. त्याच्या पात्रांचे स्वभाव विशेष विविध स्वरूपाचे आहेत. त्याच्या साहित्यात विपुल शब्दसंग्रह आणि कमालीचे शब्दसौष्ठव आहे. त्याचे संवाद कमालीचे सूचक आहेत.कोणताही कलावंत हा काळाची व भवतालाची निर्मिती असतो.तसेच तो जीवन विषयक एक दृष्टिकोनही देत असतो. या भूमिकेतून या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. हे व्याख्यान बुधवार ता.२३ एप्रिल २५ रोजी सायं. ६ वाजता समाजवादी प्रबोधिनीचे सभागृह , राजर्षी शाहू पुतळ्याजवळ इचलकरंजी येथे होणार आहे.
तरी इचलकरंजी व परिसरातील सर्व साहित्य रसिकांनी या व्याख्यानाला यावे असे आवाहन प्रबोधन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *