इचलकरंजीच्या ‘राधाकृष्ण पाणी योजने’विरोधात दानवाडमध्ये २२ ऑक्टोबरपासून बेमुदत धरणे आंदोलन

इचलकरंजीच्या ‘राधाकृष्ण पाणी योजने’विरोधात दानवाडमध्ये २२ ऑक्टोबरपासून बेमुदत धरणे आंदोलन

इचलकरंजीच्या ‘राधाकृष्ण पाणी योजने’विरोधात दानवाडमध्ये २२ ऑक्टोबरपासून बेमुदत धरणे आंदोलन
​दानवाड (प्रतिनिधी) :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने प्रस्तावित करण्यात आलेल्या जुने दानवाड उद्भव ‘राधाकृष्ण पाणी योजने’मुळे दानवाड पंचक्रोशीवर गंभीर संकट ओढवणार आहे. ही योजना कायमची हद्दपार करण्यासाठी आगामी गुरुवार, दिनांक २२ ऑक्टोबरपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
​नवे दानवाड येथील सुकुमार पाटील मळा, मराठी शाळेसमोर ‘राधाकृष्ण जल सत्याग्रहा’च्या निमित्ताने आयोजित आढावा बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. गावचे प्रतिष्ठित नागरिक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सज्जनसिंग रजपूत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
​आंदोलनामागची प्रमुख कारणे व मुदे:
​कृत्रिम दुष्काळाची भीती: इचलकरंजी शहराला पाणी देऊन दानवाड पंचक्रोशीला कृत्रिम दुष्काळाच्या छायेत लोटण्याचा डाव शेतकरी, पशुपालक व ग्रामस्थ एकत्र येऊन उधळून लावणार असल्याचा इशारा या वेळी देण्यात आला.
​पाण्याचे आरक्षण व बाष्पीभवनाचा तांत्रिक प्रश्न: इचलकरंजीसाठी वारणा-चांदोली धरणात १ टीएमसी पाणी आरक्षण दाखवले जात असले, तरी प्रचंड बाष्पीभवनामुळे ते पाणी टेल एंडवर असलेल्या दानवाडपर्यंत कसे पोहोचणार, असा कायदेशीर व तांत्रिक प्रश्न उपस्थित करण्यात आला. कागदोपत्री आरक्षणाचा बडेजाव करून शेतकरी उद्ध्वस्त करण्याचा हा कट असल्याचा आरोप झाला.
​कर्नाटक बॅरेजचे बॅकवॉटर: चांदोली-वारणेचे पाणी राजापूर बंधारा किंवा जुने दानवाडपर्यंत न पोहोचता प्रत्यक्षात या भागासाठी कर्नाटक हिप्परगी/कल्लोळ बॅरेजच्या बॅकवॉटरचा वापर होणार असून, त्यामुळे स्थानिकांच्या हक्कांवर गदा येत आहे.
​उन्हाळ्यातील जलसंकट व उपसाबंदी: मार्च ते मे या उन्हाळ्याच्या कडक महिन्यांत जलसंपदा विभाग उपसाबंदी लागू करत असताना, महापालिकेने दररोज ८९ एमएलडी (89 MLD) पाण्याचा अतिरीक्त उपसा केल्यास कृष्णा नदीवरील मैशाळ बंधाऱ्याखालील गावांना तीव्र पाणीटंचाईचा फटका बसेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली.
​प्रमुख वक्त्यांची उपस्थिती व मनोगत
​या बैठकीत पँथर आर्मी प्रमुख संतोषदादा आठवले, जुने दानवाडचे माजी सरपंच सुकुमार पाटील, नवे दानवाडचे लोकनियुक्त सरपंच डॉ. सी. डी. पाटील, खंडेराव चव्हाण ,दूध संस्थेचे चेअरमन सचिन अंबुपे, भरमगोंडा पाटील, माजी सरपंच प्रकाश परिट, ॲड. राहुल कांबळे, कुमार रजपूत, माजी सरपंच संजय धनगर व बाबासो कुन्नुरे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
​मान्यवरांसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती
​या प्रसंगी शिरोळ तालुका काँग्रेस आय पक्षाचे उपाध्यक्ष दिनेश कांबळे, ग्रामपंचायत सदस्य शिवानंद माळी, श्रावण कांबळे, शिवाजी साळुखे, भगतसिंग शिलेदार, अरुण पाटील, भरमा गुरव, रावसो बागे, आण्णासो पाटील, विजय पाटील, जुने दानवाडचे माजी सरपंच नामदेव कांबळे, माजी ग्रा.प. सदस्य मारुती कांबळे, दादासो पिरकाने, सुरेश पिरकाने, उत्तम कांबळे प्रल्हाद सांळुखे (पत्रकार ), शिवगोंडा पाटील , सुरेश बेरड , महेश अंबुपे , सुनिल पाटील , राजगोंडा पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *