महानायक अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त सुरांची मैफल
कोल्हापूर, दि. १२ (प्रतिनिधी) रिलायन्स मॉल येथे ‘दे दे प्यार दे…’ बॉलिवूड म्युझिकल नाईट हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. रिलायन्स मॉल च्या सहकार्याने परिवर्तन फाउंडेशन प्रायोजित या सोहळ्यात अमिताभ बच्चन यांच्या अजरामर गाण्यांचा नजराणा ऐकण्यासाठी संगीतप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमादरम्यान युवा उद्योजक पृथ्वीराज पठाडे, ॲड. धनजंय पठाडे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते केक कापण्यात आला.
याप्रसंगी बोलताना ॲड. धनजंय पठाडे यांनी, अमिताभ बच्चन हे भारतीय चित्रपटसृष्टीचे महानायक असून त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि अभिनय उत्कृष्ठ आहे असे मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी पी. कुमार, गायक उमेश जाधव, रिलायन्स मॉल चे व्यवस्थापक दीपक ढगाले, परिवर्तन चे अध्यक्ष अमोल कुरणे, न्याय निवाडा चॅरिटेबल फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत दिंडे, गायक संदीप मालेकर, सुरेश कबीर व सहकारी उपस्थित होते. संगीतप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा सोहळा विशेष लक्षवेधी ठरला.
