जनहित फाउंडेशनच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त 28 एप्रिल रोजी दादर मुंबई येथे राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन
मुंबई : जनहित फाउंडेशनच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त 28 एप्रिल रोजी सांयकाळी 4:30 वाजवा दादर येथील येथील अखिल भारतीय कीर्तन संस्था ” मांगल्य सभागृह ” येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे .
. जनहित फाउंडेशन गेल्या ३ वर्षापासून जनतेच्या विविध प्रश्नावर सरकार तसेच जिल्हा,तालुका,ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा तसेच पत्रव्यवहार करून जनहिताची कामे करीत आहोत.देशाच्या संविधान तसेच लोकशाही अबाधित राहावी यासाठी साठी जागृत राहून आपले विचार मांडून जनजागृती करीत आहोत.संस्थेचे अध्यक्ष पत्रकार श्री उमेश जामसंडेकर,सचिव श्री महेन्द्र वाघमारे आणि जिल्हा पदाधिकारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.संतोष आठवले .विशेष अतिथी म्हणून सुप्रसिध्द गायिका आणि संगीतकार तसेच संगीत नाट्य लेखिका मा.सौ.मधुवंती पेठे,पोलिस खात्यात यशस्वी कामगिरी करणारे निवृत्त वरिष्ठ अधिकारी मा.श्री.अजित देशमुख,नालासोपारा आयुर्वेद कॉलेज च्या ट्रस्टी वैद्य सौ. ओमप्रकाश दुबे,अनेक शासकीय पुरस्कारांनी सन्मानित ज्येष्ट समाजसेवक मा.श्री. राजेंद्र लकेश्री उपस्थित राहणार आहेत.संस्थेचे अध्यक्ष पत्रकार श्री उमेश जामसंडेकर यांनी या प्रसंगी समाजातील विविध क्षेत्रात सेवा देणाऱ्या सेवाभावी संस्था तसेच व्यक्ती यांना सन्मानित करण्याचे योजिले आहे.या कार्यक्रमास पत्रकार आणि मीडिया यांनी उपस्थित राहून संघटनेच्या उपक्रमात सामील व्हावे असे आवाहन जनहित फाउंडेशनचे सचिव महेंद्र वाघमारे यांनी केले आहे .