चोकाक येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी
तरुणांनी शिक्षणाला प्राधान्य द्यावे -: प्रा डॉ पी एस कांबळे
हातकणंगले तालुक्यातील चोकाक येथे महामानव बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी केली यावेळी दिनांक 13/4/2025 रोजी रात्री 12 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पवहन करून त्रिसरण पंचशील ग्रहण करून जयंती सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला तसेच दिनांक 14/4/2025 रोजी सकाळी बाबासाहेबांच्या विचारांची ज्योती चे आगमन त्यानंतर पंचशील ध्वजारोहन, वक्तृत्व स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले तसेच सायंकाळी 6 च्या सुमारास डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत विकसित भारत या विषयावर व्याख्याते प्रा डॉ पी एस कांबळे यांचे यांचे व्याख्यान, व्याख्याना दरम्यान सध्याचा तरुण वर्ग शिक्षणा पासून वंचित होत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले शिक्षणावर भर दिला यावेळी शिक्षणाचे महत्व विशद केलं तरुणांनी शिक्षण घेतलं तर उदया चा विकसित भारत दिसेल असं ही यावेळी बोलताना त्यांनी सांगितले शिक्षणा पासून वंचित राहिलं तर याचे दुष्परिणाम काय होतील हे देखील ते बोलत होते, शेतीला शिक्षणाचा दर्जा मिळावा, शिक्षणाच्या जोरावर सर्व काही साध्य करता येते असे ही ते यावेळी बोलत होते, मंगळवारी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक अतिशबाजी आणि जय भीम च्या गजरात काढण्यात आली यावेळी सर्व परिसर दुम दुमला तो जय भीम च्या घोषणानी गावात लावलेले जयंती शुभेच्छा फलक लक्ष वेधून गेले, यावेळी उपास्थित शिवसेना उपजिल्हा प्रमुख अविनाश जी बनगे, नूतन कमिटी अध्यक्ष मधुकर चोकाककर, उपाध्यक्ष बाबासाहेब कांबळे, सचिव अशोक चोकाककर, खजिनदार सुरेश बाळू कांबळे, युवा नेते अभय बनगे, सरपंच सुनील चोकाककर, ग्रामपंचायत सदस्य अरुण व्हनाळे, ग्रामपंचायत सदस्य हर्षदकुमार कांबळे, महावीर पाटील, सदस्य सविता चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते राजू ननवरे रणजित कदम, ग्रामपंचायत सदस्य प्रणाली कांबळे, युवा नेते अखिल चव्हाण, नेते प्रकाश चव्हाण, भास्कर चव्हाण, उत्तम चोकाककर सौ प्रमिला चोकाककर, प्रीतम मुळीक, सुभाष माने, दिलखुश कांबळे, सागर कांबळे डी जे नूतन कमिटी सदस्य सुनील वजीर जाधव, भरत ढाले, मनोहर वजीर कांबळे, संजय कांबळे, विजय आदू कांबळे, योगेश चोकाककर, प्रवीण माने, यांच्यासह बौध्द उपासक उपासिका मोठया संख्येने उपास्थित होते.