अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त सुरांची मैफल!११ ऑक्टोबर रोजी ‘दे दे प्यार दे…’ बॉलिवूड म्युझिकल नाईटचे आयोजन

अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त सुरांची मैफल!११ ऑक्टोबर रोजी ‘दे दे प्यार दे…’ बॉलिवूड म्युझिकल नाईटचे आयोजन

अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त सुरांची मैफल!
११ ऑक्टोबर रोजी ‘दे दे प्यार दे…’ बॉलिवूड म्युझिकल नाईटचे आयोजन

कोल्हापूर,दि.९ (प्रतिनिधी)
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोल्हापुरात रिलायन्स मॉलच्या बहुमूल्य सहकार्याने एका शानदार संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘दे दे प्यार दे…’ या विशेष बॉलिवूड म्युझिकल नाईटमध्ये अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांतील अजरामर आणि लोकप्रिय गाण्यांचा नजराणा सादर केला जाणार आहे. हा कार्यक्रम ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ ते रात्री १० या वेळेत रिलायन्स मॉल लक्ष्मीपुरी, कोल्हापूर येथे पार पडणार आहे.
हा कार्यक्रम उमेश जाधव यांच्या संकल्पनेतून साकारत आहे. परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल कुरणे यांचे या कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभले असून, सुरेश कबीर यांचेही सहाय्य आहे. या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे अमिताभ जी यांच्यावर चित्रित झालेली गाणी गाण्याची सर्व रसिकांना येथे मोफत संधी दिली जाणार आहे. तसेच कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व सिंगर्ससाठी ब्रेकफास्टची व्यवस्था करण्यात आली आहे.
कोल्हापुरातील सर्व संगीतप्रेमी, गायक आणि अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. महानायकाच्या वाढदिवसाचा हा आनंदोत्सव संगीतमय वातावरणात साजरा करण्यासाठी सर्व नागरिकांनी व कलाकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक उमेश जाधव आणि सहकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *